संभाजीराजे तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत:डॉ. राजरत्न आंबेडकरांसह इतरांना सोबत घेणार

संभाजीराजे तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत:डॉ. राजरत्न आंबेडकरांसह इतरांना सोबत घेणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यातील स्वराज्य पक्षाच्या ‘स्वराज्य भवन’मध्ये स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान किसान पक्षाचे प्रमुख नारायणराव अंकुशे व इतर घटक पक्षांची एकत्रित बैठक गुरुवारी पार पडली. सुसंस्कृत व सक्षम महाराष्ट्रासाठी राज्यात तिसरा पर्याय देण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केला. या बैठकीला स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, प्रहार पक्षाचे गौरव जाधव, स्वराज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राने दुसऱ्या राज्यांना दिशा देण्याचे काम केले. परंतु सध्या राज्यातील राजकारण हेवेदाव्यांपुरते उरले असून, राज्य दिशाहीन झाले आहे. म्हणून सक्षम व सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आजची बैठक घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हेही आमच्यासोबत आले आहेत. शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जाण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. संविधानावर आता कुणी बोलत नाही : डॉ. राजरत्न राजरत्न आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी संविधान धोक्यात असल्याचे नरेटिव्ह पसरवले गेले. परंतु आता कुणीही त्यावर बोलताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लावण्याचा निर्णय घेतला. त्याचे काँग्रेसने स्वागत करणे दुर्दैवी आहे.

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यातील स्वराज्य पक्षाच्या ‘स्वराज्य भवन’मध्ये स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान किसान पक्षाचे प्रमुख नारायणराव अंकुशे व इतर घटक पक्षांची एकत्रित बैठक गुरुवारी पार पडली. सुसंस्कृत व सक्षम महाराष्ट्रासाठी राज्यात तिसरा पर्याय देण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केला. या बैठकीला स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, प्रहार पक्षाचे गौरव जाधव, स्वराज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राने दुसऱ्या राज्यांना दिशा देण्याचे काम केले. परंतु सध्या राज्यातील राजकारण हेवेदाव्यांपुरते उरले असून, राज्य दिशाहीन झाले आहे. म्हणून सक्षम व सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आजची बैठक घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हेही आमच्यासोबत आले आहेत. शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जाण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. संविधानावर आता कुणी बोलत नाही : डॉ. राजरत्न राजरत्न आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी संविधान धोक्यात असल्याचे नरेटिव्ह पसरवले गेले. परंतु आता कुणीही त्यावर बोलताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लावण्याचा निर्णय घेतला. त्याचे काँग्रेसने स्वागत करणे दुर्दैवी आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment