उद्धव ठाकरेंची ही परिस्थिती संजय राऊतांमुळे:ठाकरेंनी आता तरी योग्य दिशा घ्यावी- नरेश म्हस्के
उद्धव ठाकरेंची ही परिस्थिती संजय राऊत यांच्यामुळे झाली आहे. 24 तास लोकांची सेवा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकांनी साथ दिली आहे. राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने जोडे मारले आहेत. गिरे तोभी टांग उपर अशी त्यांची परिस्थिती आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांचे उबरठे झिजवणे, सोनिया गांधी मांडिलकत्व स्वीकारणे. उद्धव ठाकरे यांची जी दशा झाली आहे, त्यांनी आता तरी योग्य ती दिशा घ्यायला हवी. संजय राऊतमुळे उद्धव ठाकरेंची वाताहत झाली हे लोकांच्या समोर आले आहे. आता संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनता तोंडवर जोडे मारतील. एकहाती महायुतीची सत्ता येणार नरेश म्हस्के म्हणाले की, आम्हाला हॉटेल बूक करण्याची गरज नाही. महायुतीचा विजय होताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सर्वांनी निवडणूक लढवली तर तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे आम्हाला वाटते. हे माझे मत आहे. बाळासाहेबांनी जी शिवसेना सुरू केली ती चालवण्यासाठी एकनाथ शिंदे सक्षम असल्याचे आजच्या निवडणुकीतून दिसून येत आहे. शिवसेना कोण याचे उत्तरही जनतेने दिले- दरेकर प्रविण दरेकर म्हणाले की, लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केली. धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल. महायुतीने 200 जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढंच नाही तर खरी शिवसेना कोण याचे उत्तरही जनतेने दिले आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा दावा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.