एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस:आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा; विजय वडेट्टीवार, रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस:आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा; विजय वडेट्टीवार, रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासह इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांनी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 50% बससेवा ठप्प होती, त्यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी राष्ट्रपती मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यात व्यग्र होते. शिंदे यांनी आज या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. सणासुदीच्या दिवसांत संप करू नये, सरकार तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा निर्धार संघटनांनी केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आलीच का? वडेट्टीवार यांचा सवाल या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणाबाबत त्यांनी एक पोस्ट करत सरकारला प्रश्न विचारला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘हे सरकार काम करते तर मग एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आलीच का? या सरकार मध्ये कामे कोणाची होत आहे? महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे राजकारण भाजपने केले होते. भाजपच्या नेत्यांनी मुद्दाम राजकारण करून संप भडकवण्याचे काम त्यावेळी केले. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यांनी आता कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारने विचार करावा. गणपती आणि ऐन सणासुदीच्या काळात एसटी चा संप सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणींना आणि आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी आणि राज्यातील सामान्य प्रवाशी दोघांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि तातडीने हा संप सोडवावा ही आमची मागणी आहे.’ आमदार रोहित पवार यांचेही संप मगे घेण्याचे आवाहन या संदर्भात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या रास्त आहेत, परंतु संपामुळं संपूर्ण राज्यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात संपामुळं विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरीक यांच्यासह रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळं सरकारने एसटी कर्मचारी संघटनांशी सकारा्त्मक चर्चा करुन या प्रश्नातून तातडीने मार्ग काढावा, ही विनंती.’ राज्यातील इतरही बातम्या वाचा…. रविकांत तुपकर यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन:सोयाबीन-कापसाची दरवाढ, कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकरी आणि तरुणांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु होत आहे. या आधी देखील तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पूर्ण बातमी वाचा… उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास:राष्ट्रपतींच्या उदगीर येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत राष्ट्रपती महोदयांच्या कार्यालयाला अवगत करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. पूर्ण बातमी वाचा… शरद पवारांनी पुन्हा ठोकरली उद्धव ठाकरेंची मागणी:मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचे कारण नाही, आकडेवारीनुसार निर्णय घेणार मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप विचार करण्याचे अजिबात कारण नाही. यापूर्वी अनेक वेळा असे घडले आहे की, नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा निर्णय हा निवडणुका झाल्यानंतर संख्येनुसार घ्यायचा असतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आज कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल असे वातावरण आहे यात शंका नाही. मात्र, तरी देखील त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या निमित्त ते माध्यमांशी संवाद साधत होते. पूर्ण बातमी वाचा…. स्टेनलेस स्टील वापरले असते तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सल्लावजा सूचना सिंधुदुर्ग मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणात राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी उपाय सुचवला आहे. समुद्रकिनाराच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…

​शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासह इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांनी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 50% बससेवा ठप्प होती, त्यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी राष्ट्रपती मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यात व्यग्र होते. शिंदे यांनी आज या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. सणासुदीच्या दिवसांत संप करू नये, सरकार तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा निर्धार संघटनांनी केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आलीच का? वडेट्टीवार यांचा सवाल या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणाबाबत त्यांनी एक पोस्ट करत सरकारला प्रश्न विचारला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘हे सरकार काम करते तर मग एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आलीच का? या सरकार मध्ये कामे कोणाची होत आहे? महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे राजकारण भाजपने केले होते. भाजपच्या नेत्यांनी मुद्दाम राजकारण करून संप भडकवण्याचे काम त्यावेळी केले. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यांनी आता कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारने विचार करावा. गणपती आणि ऐन सणासुदीच्या काळात एसटी चा संप सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणींना आणि आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी आणि राज्यातील सामान्य प्रवाशी दोघांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि तातडीने हा संप सोडवावा ही आमची मागणी आहे.’ आमदार रोहित पवार यांचेही संप मगे घेण्याचे आवाहन या संदर्भात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या रास्त आहेत, परंतु संपामुळं संपूर्ण राज्यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात संपामुळं विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरीक यांच्यासह रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळं सरकारने एसटी कर्मचारी संघटनांशी सकारा्त्मक चर्चा करुन या प्रश्नातून तातडीने मार्ग काढावा, ही विनंती.’ राज्यातील इतरही बातम्या वाचा…. रविकांत तुपकर यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन:सोयाबीन-कापसाची दरवाढ, कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकरी आणि तरुणांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु होत आहे. या आधी देखील तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पूर्ण बातमी वाचा… उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास:राष्ट्रपतींच्या उदगीर येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत राष्ट्रपती महोदयांच्या कार्यालयाला अवगत करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. पूर्ण बातमी वाचा… शरद पवारांनी पुन्हा ठोकरली उद्धव ठाकरेंची मागणी:मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचे कारण नाही, आकडेवारीनुसार निर्णय घेणार मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप विचार करण्याचे अजिबात कारण नाही. यापूर्वी अनेक वेळा असे घडले आहे की, नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा निर्णय हा निवडणुका झाल्यानंतर संख्येनुसार घ्यायचा असतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आज कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल असे वातावरण आहे यात शंका नाही. मात्र, तरी देखील त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या निमित्त ते माध्यमांशी संवाद साधत होते. पूर्ण बातमी वाचा…. स्टेनलेस स्टील वापरले असते तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सल्लावजा सूचना सिंधुदुर्ग मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणात राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी उपाय सुचवला आहे. समुद्रकिनाराच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment