मुंबई : मालिकांमधले कलाकार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे चाहतेही कलाकारांचे रील्स, पोस्ट यांची वाट पाहात असतात. आई कुठे काय करते मालिकेतली संजना म्हणजे रुपाली भोसलेनं नुकताच तिचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिनं तिचे केस एकदम कमी केलेत.

रुपालीनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे की या लूकमुळे तिला लहानपणीचे दिवस आठवलेत. रुपालीनं याचं श्रेय तिच्या हेअर ड्रेसर्सना दिलं आहे. ती म्हणते, अगोदर एवढे केस कापायला त्या तयार नव्हत्या. पण मन घट्ट करून त्यांनी हे केलं. पुढे ती असंही म्हणते की माझा लूक बदलायची वेळ येते, तेव्हा माझ्या हेअर ड्रेसर्स महत्त्वाची भूमिका निभावतात.

सुशांतसिंह राजपूतबाबत आमिर खानचा भाऊ फैसलचा खळबळजनक आरोप, म्हणाला…

रुपालीच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. ती तिचे बरेच फोटोही शेअर करत असते. आता इतक्या शाॅर्ट हेअर कटमध्ये रुपाली मालिकेतही तशीच दिसणार का? संजनाचाही मेकओव्हर दाखवणार का, असे अनेक प्रश्न चाहत्यांनाही पडले आहेत. तिच्या पोस्टवर अनेकांनी लूक चांगला दिसतो, म्हटलंय. तर काहींनी कशाला केस कापले, आता वाढायला वेळ लागणार असंही लिहिलं आहे.

गणेशोत्सवातही रुपालीची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. तिच्या घरी बाप्पांचं आगमन झालं होतं. संजना फेम रुपाली भोसलेनंही भावाबरोबर स्वत: उचलून गणपती घरी आणला. ती लिहिते, ‘तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्ताच्या कानाइतका विशाल असावा, अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात,आयुष्य त्याच्या सोंडेइतकं लांब असावं आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत.

Brahmastra च्या सेलिब्रेशनमध्ये करण जोहर सांगतोय काहीतरी महत्त्वाचं; चाहत्यांना म्हणाला,थोडं थांबा!

सध्या मालिकेत रुपालीची संजना नकारात्मक वागत नाही. उलट निगेटिव्ह वागणाऱ्या अनिरुद्धला ती वेळोवेळी खडसावत असते.

श्रद्धाचा नो मेकअप लूक, तरीही दिसते इतकी सुंदरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.