मुंबई: गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने रविवारी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली. सकाळी सात वाजता ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यासह भांडूप परिसरातील राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरात झाडाझडती आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची चौकशी अशा दुहेरी ऑपरेशनला सुरुवात केली आहे. मात्र, ही चौकशी सुरु असतानाही संजय राऊत यांचे मनोबल थोडेही खच्ची झाल्याचे दिसत नाही. कारण, ही चौकशी सुरु असतानाच संजय राऊत यांनी काही ट्विटस केली आहेत. (ED raids on Shivsena leader Sanjay Raut house)

या ट्विटसमध्ये संजय राऊत यांनी, ‘खोटी कारवाई..खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे. राऊतांच्या या एकूण ट्विटसचा सूर पाहता संजय राऊत हे ईडीसमोर सहजासहजी शरण जातील, असे दिसत नाही. त्यामुळे आता ईडी संजय राऊत यांना त्यांच्या कार्यालयात नेणार किंवा त्यांना अटक करणार का, हे पाहावे लागेल. सध्या ईडीचे अधिकारी संज राऊत यांची कसून चौकशी करत आहेत. गेल्या दोन तासांपासून संजय राऊत यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु आहे.

संजय राऊत ट्विटसमध्ये आणखी काय म्हणाले?

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. मरेन पण शरण जाणार नाही. मी शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

ईडीच्या या कारवाईबद्दल नितेश राणे यांनी आनंद व्यक्त केला आहे. पत्राचाळमध्ये जे गरीब रहिवासी होते, गरीब मराठी कुटुंबीय होते, त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. संजय राऊत स्वत:ला खूप मोठे समजायचे, झुकेगा नय, असे डायलॉग मारायचे. आता त्यांना जाऊन विचारा, असे नितेश राणे यांनी म्हटले. संजय राऊत हे इतके दिवस आमची प्रत्येक सकाळ खराब करायचे. आज ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर त्यांची सकाळ खराब झाली आहे. हे बघून निश्चितपणे समाधान वाटत आहे, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.