मुंबई :संजय राऊत यांची ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांची ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर चौकशी करण्यातआली. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीनं रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला होता.

पत्रा चाळ प्रकरणी ईडीची संजय राऊतांवर कारवाई

संजय राऊत यांच्या घरी ईडीनं रविवारी सकाळी छापा टाकला. संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. संजय राऊत यांच्या घरातून पत्राचाळ प्रकरणी एकही कागद ईडीला मिळाला नसल्याची माहिती देखील संजय राऊत यांच्या वकिलांनी दिली. मात्र, दिल्लीतून ईडीचे अधिकारी मुंबईत दाखल झाल्यानंतर राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

संजय राऊतांच्या घरातून साडे अकरा लाख जप्त, ईडीनं जप्त केलेल्या रकमेचा हिशोब लागला, सूत्रांची माहिती

संजय राऊतांची ईडी कार्यालयात पोहोचले तेव्हाची प्रतिक्रिया

शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहेत. हे सगळं दमनचक्र सुरु आहे, असा आरोप केला आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Video : सेनेनंतर काँग्रेसचा नंबर? सोमय्यांच्या आरोपानंतर अस्लम शेख फडणवीसांच्या भेटीला

पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय?

पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला. मुंबईतील गोरेगाव येथे ६७२ घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांचा म्हाडा आणि बिल्डर सोबत करार झाला. म्हाडा, गुरु आशिष बांधकाम कंपनी आणि रहिवासी यामध्ये हा करार झाला होता. एकूण १३ एकर जागेपैकी साडेचार एकर वर मूळ रहिवाशांना घर आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री बांधकाम करेल असं ठरलं होतं. मात्र गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर ही जागा खाजगी बिल्डरला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात ईडी कडून यापूर्वी गुरु आशिष कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

वाढदिवस होता; मुलाने केकवरची स्पार्कल मेणबत्ती पेटवली आणि घडले ते खूपच भयानकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.