संजय राऊतांचे वडेट्टीवारांसह अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर:म्हणाले, ‘I.N.D.I.A.’ आघाडी तुटली तर पुन्हा जुडणार नाही; काँग्रेसने पुढाकार घेण्याचा सल्ला
राष्ट्रीय पातळीवर ‘I.N.D.I.A.’ आघाडी तुटली तर ती पुन्हा जुडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे. जागा वाटपात झालेला उशीर कोणामुळे झाला? यावरून विजय वडेट्टीवार यांना देखील माहिती असल्याचे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर आमच्या पक्षात सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसऱ्या गटात जाण्याचा कोणीही सल्ला देत नाही, असा असे म्हणत राऊत यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे. खासदार संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला उशीर झाला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्याला देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जागा वाटपाच्या चर्चेमध्ये विजय वडेट्टिवार देखील होते. त्यामुळे उशीर होण्याचे कारण त्यांना देखील माहिती असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. जागा वाटपाची चर्चा लांबवण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, वडेट्टीवांरांनी विदर्भातील जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असत्या, तर जागा वाटपाची चर्चा लवकर संपली असती, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या जागा काँग्रेस लढले आणि हरले आहेत, त्या जागेवरुन राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.