[ad_1]

मुंबई : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कॅसिनो खेळत असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना तसेच सामाजिक वातावरण बिघडलेले असताना परदेश दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी एका रात्रीत कॅसिनोमध्ये साडे तीन कोटी रुपये उडवले, असा गंभीर राऊत यांनी केला. बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट करून महाराष्ट्र पेटलेला असताना मकाऊ येथे ते कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असा सनसनाटी दावा राऊत यांनी केला. मात्र राऊतांनी केलेल्या आरोपांचं बावनकुळेंनी स्पष्टपणे खंडन केलं आहे.

महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. ते जर मी पोस्ट केले तर भाजपचे दुकान बंद होईल. तशी कृती मी करणार नाही. कारण आमच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. फक्त बावनकुळेंनी तो मी नव्हेच हे सांगावं, असं आव्हानच राऊत यांनी दिलंय. दरम्यान, ट्विटनंतर राऊत आणि बावनकुळे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असं स्पष्ट करत बावनकुळेंनी राऊतांच्या आरोपांचं खंडन केलं. त्यावर पलटवार करताना राऊत म्हणाले, “तुमच्यासोबत चिनी कुटुंब आहे का? एक्सडेंड फॅमिली चायनिज आहे का? काहीही बोलताय…! खोटं बोलाल तेवढं फसाल, कारण माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत!”
कॅसिनोच्या टेबलवर बावनकुळे काय करतायेत?

कॅसिनोच्या टेबलवर नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल… झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय? असा सूचक इशारा राऊतांनी दिलाय.

नाना पटोले यांच्याकडून बावनकुळेंच्या चौकशीची मागणी

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे. बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कुठून? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *