संत भास्कर महाराज पायी दिंडीचे शनिवारी होणार आळंदीकडे प्रस्थान:प्रशासनाची दिशाभूल करून कंत्राटदाराची मनमानी होत असल्याचा आरोप
अकोट येथून जवळच असलेल्या श्रींची जन्मभूमी श्रीक्षेत्र आकोली जहांगीर येथून शेगावकर श्री संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचे ३ नोव्हेंबर रोजी प्रस्थान होणार आहे. हा सोहळा सकाळी १० वाजता पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून श्री क्षेत्र आळंदी देवाचीकडे प्रस्थान करणार आहे. वैकुंठवासी गुरुवर्य वासुदेव महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने वारीची परंपरा श्री संत भास्कर महाराज ट्रस्टचे अशोक महाराज जायले चालवत आहेत. अशोक महाराज जायले यांच्या हस्ते श्रींचा व विठ्ठल रुक्मिणी यांचा अभिषेक व महाआरती होऊन वारीला प्रारंभ होणार आहे. सोहळ्यासोबत दिंडी संचालक मोहन महाराज रेळे राहणार आहेत. सकाळचा विसावा वासुदेव महाराज अस्वार यांच्याकडे घेण्यात घेणार असून, श्रींच्या पादुकांचे पूजन व ज्ञानेश्वरी प्रवचन भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता श्रींचा पालखी सोहळा श्री क्षेत्र आकोली जहांगीर अकोट लोहारी, चिचखेड, लामकानी, दापुरा फाटा, बोरगाव वैराळे, अंदुरा, सोनाळा, कारंजा (रम) शेगाव मार्गे लासुरा, गारडगाव, गणेशपूर, टाकरखेडा, मु चिखली, वरूड नाका, टेंभुर्णी, राजुर गणपती, दाभाडी, लाडसांगवी, दुधळ, श्री संत गजानन महाराज मंदिर (गारखेडा) छत्रपती संभाजी नगर, वाळुज, भेंडाळा प्रवरा, संगम, श्री क्षेत्र नेवासा, तामसवाडी, ढोरेगाव, तोंडमल वस्ती अहमदनगर, कामरगाव, पळवे खुर्द, सदरवाडी, रांजणगाव गणपती, शिक्रापूर शेल, पिंपळगाव, चाकण, काळभोर वाडी, डुडुळगाव श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान होऊनश्री क्षेत्र आळंदी देवाची नगर प्रदक्षिणा करून निजानंद बाबा आश्रमात २० नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे. काकडा, प्रवचन, कीर्तन, हरीपाठ होणार आळंदी क्षेत्र येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताह दरम्यान पहाटे काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन, कीर्तन, हरीपाठ होणार आहे. दिंडी सोहळ्यासोबत महाराज मंडळी अशोक महाराज जायले, ज्ञानेश्वर महाराज वाघ, मोहन महाराज रेळे, वासुदेव महाराज अस्वार, मंगेश महाराज ठाकरे, पंकज (सुदामा) महाराज, आगरकर शिवा महाराज, रेचे सुरेश महाराज, मानकर शास्त्री नागोराव महाराज, चौखंडे आत्माराम महाराज, वाकोडे सुधाकरराव जायले, विश्वासराव रेळे, रवींद्र सोळंके, रोशन अढाऊ आदी महाराज मंडळी व सेवाधारी मंडळी उपस्थित राहणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष अशोक महाराज जायले यांनी कळवले आहे.