सराईत गुन्हेगारांना सापळा रचून पकडले:दोघांकडून 14 लाखांचे मेफेड्रोन आणि पिस्तूल हस्तगत

सराईत गुन्हेगारांना सापळा रचून पकडले:दोघांकडून 14 लाखांचे मेफेड्रोन आणि पिस्तूल हस्तगत

सराईत गुन्हेगार मेफेड्रोन हा अंमली पदार्थ बाळगत संशयितरित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवार पेठेत सापळा रचून दोन सराईत आरोपींना पकडून त्यांच्या ताब्यातून १४ लाख ६० हजार रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल आणि दोन काडतुसे हस्तगत केली आहे. आरोपी बॉबी भागवत सुरवसे (वय- २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, लक्ष्मीनगर येरवडा,पुणे) आणि तौसिम ऊर्फ लडडु रहिम खान (वय -३२, रा. १२८२ , कसबा पेठ,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात आरोपींवर एनडीपीएस व आर्म्स अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून पकडले पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक दोन आणि खंडणी विरोधी पथक दोनचे पथक हद्दीत गस्त घालत होते.गुन्हेगार बॉबी सुरवसे आणि तौसिम खान हे शुक्रवार पेठेतील मारूती मंदिराजवळ संशयितरित्या थांबले असून, त्यांच्याकडे अंमली पदार्थ आणि पिस्तूल असल्याची माहिती पोलिस तपास पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन जणांना पकडले. बॉबी सुरवसे याची पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतूसे जप्त करण्यात आले. बॉबी आणि साथीदार तौसिम यांच्याकडून अंमली पदार्थ मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या अधिकाऱ्यांनी केली कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, साहिल शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अझिम शेख, अमोल राऊत, पवन भोसले, नीलम पाटील यांनी ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करत आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment