मुंबई : आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान अभिनेत्री तनुजा यांनी निर्माण केलं. आज , २३ सप्टेंबर तनुजा त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बालकलाकार म्हणून तनुजा यांनी त्यांच्या अभिनया क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. १९५० मध्ये तनुजा यांनी त्यांची मोठी बहिण आणि प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांच्याबरोबर ‘हमारी बेटी’ या सिनेमातून मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये आलेल्या ‘छबीली’ सिनेमात हिरॉईन म्हणून काम केलं. तनुजा यांचं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली होती.

तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांची लेक काजोल (Kajol ) आणि जावई अजय देवगण यांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. काजोलनं तनुजा यांचा एक जुन्हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर जावई अजयनं तनुजा यांचा एक हसरा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजयची ही अत्यंत औपचारिक पोस्ट पाहून अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी त्याच्या पोस्टवर ‘सासूबाई, आई असं लिहायला तुला त्रास होतो का?’ असा थेट प्रश्नच विचारला आहे.

काजोलनं शेअर केला आईचा जुना व्हिडिओ

काजोलनं तनुजा यांचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये बालकलाकार तनुजा ते आतापर्यंतचे त्याचे विविध अंदाजातील फोटो आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तुनजा यांच्याच ज्वेल थीफ सिनेमातील ‘रात अकेली है, बुझ गए दिए, आके मेरे पास कानों मे मेरे जो भी चाहे कहिए…’ हे गाणं ऐकू येतं.

हा व्हिडिओ शेअर करत काजोलनं तिच्या आईसाठी छानशी पोस्टही लिहिली आहे. तिनं लिहिलं आहे की, ‘ तू सिनेमा विश्वामध्ये ७० वर्ष पूर्ण केली आहेत तर माझी आई म्हणून ४८ वर्षे… या संपूर्ण प्रवासामध्ये मी तुझ्याबरोबर कायम सुरक्षितपणं वावरत होते. आजही तू अशा अनेक गोष्टी सतत ट्राय करत असतेस, त्यावर चर्चा करत असते ज्यामुळे आपण आयुष्य जगण्यासाठी सक्षम ठरत असतो…’ काजोलनं तिच्या पोस्टमध्ये पुढं लिहिलं आहे की, ‘मृत्यू पासून संवेदनेपर्यंत, दान, राग, कडवटपणा, प्रेम आणि क्षमेपर्यंत… जसं तू म्हणतेस जर मी तुम्हाला या गोष्टी सांगत बसले तर एक दिवस शेवटापर्यंत जाईन आणि तेव्हा या गोष्टींची सर्वात जास्त गरज असेल. याच गोष्टी उपयोगात येतील. त्यासाठी मी रोज तुझे आभार मानते. कारण तुझ्यामुळे मी जबाबदार झाले. तू आम्हाला पळून जायला नाही तर पर्वताप्रमाणे अविचल रहायला शिकवलं, निर्भयपणं उडायला शिकवलं. मी कायम तुझी पहिली लेफ्टिनेंट आणि तुझा सैन्याची कमांडर होते आणि तू माझी सर्वात लाडकी कॅप्टन आणि माझी राणी असशील. आई, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!’

जावयानं केलं औपचारिकपणं विश

तनुजा यांचा जावई आणि अभिनेता अजय देवगण यानं आपल्या सासूबाईंना अत्यंत औपचारिक अंदाजामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजयनं तनुजा यांचा हसरा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान अजयनं अशा प्रकारे औपचारिक पद्धतीनं शुभेच्छा दिल्यानं अनेक नेटकऱ्यांनी त्याची टिंगल केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, हे ट्विट नक्की काजोलनं केलं असेल अजयच्या अकाऊंवरून, तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, सासूबाई तरी लिहायचं रे, आणखी एकानं लिहिलं आहे की, ‘सासूबाई असं लिहिताना तुझी बोट दुखली का. अर्थात बॉलिवूडमधील लोकांवर संस्कार कुठं असतात? आजची संध्याकाळ विमलसोबत चांगली जाईल. असो आमच्याही शुभेच्छा सांग त्यांना.’ तर आणखी एकानं लिहिलं की, ‘आई, असं म्हण रे नाही तर घरी जेवण नाही मिळणार तुला…’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.