Satara News: साताऱ्यातील हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे मॅरेथॉनदरम्यान एका धावपटूचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू या धावपटूचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा धावपटू कोल्हापुरातील असल्याची माहिती आहे.

 

satara hill half marathon
सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट

हायलाइट्स:

  • सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दुर्दैवी घटना
  • धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
  • मृत राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू कोल्हापूरचा
सातारा: साताऱ्यातील हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे मॅरेथॉनदरम्यान एका धावपटूचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू या धावपटूचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा धावपटू कोल्हापुरातील असल्याची माहिती आहे.हा धावपटू राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असल्याचीही माहिती आहे. राज पटेल असं या खेळाडूचं नाव आहे. मॅरेथॉनदरम्यान धावताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर त्याला तात्काळ सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. या घटनेने साताऱ्यातील प्रसिद्ध अशा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट लागलं आहे.

सातारा हिल हाफ मॅरेथॉन

सातारा रनर्स फाऊंडेशनच्या वतीने साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजित केलं जातं. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला आज सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. देशातील तिसऱ्या क्रमांकाची ही स्पर्धा असून अवघड अशा यवतेश्वर घाटमाथ्यावर ही स्पर्धा पार पडते. देशातील तब्बल ७५०० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. सकाळी साडे सहा वाजता पोलीस कवायत मैदानावरुन या स्पर्धेला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते फ्लॅगऑफ ने सुरुवात करण्यात आली. देश विदेशातुन अनेक स्पर्धक या मॅरेथॉन मध्ये सहाभागी होतात.

सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला जोशात सुरुवात, देशभरातील स्पर्धकांचा सहभाग

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.