सत्तार, केसरकर, राठोडांसह सावंतांच्या मंत्रिमंडळ समावेशास भाजपचा आक्षेप:राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

सत्तार, केसरकर, राठोडांसह सावंतांच्या मंत्रिमंडळ समावेशास भाजपचा आक्षेप:राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, आणि संजय राठोड यांना नव्या मंत्रिमंडळात घेण्यास भाजपने आक्षेप घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चौघांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याने त्यांना विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे आपल्या दरेह्या गावी गेल्याने महायुतीची बैठक काल रद्द झाली. यातच आता भाजपच्या या भूमिकेनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी शिंदे आग्रही असल्याचे बोलले जात आहे. ..तर शिंदेंच्या डोक्याला होऊ शकतो ताण एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदार, खासदारांना त्यांनी अजून नाराज होऊ दिलेले नाही. तिकीट कापलेल्या खासदारांना विधान परिषद, महामंडळे देत त्यांनी खूश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही तर ह्यामुळे त्यांच्यामागच्या ताण वाढू शकतो.

शिंदे मोठा निर्णय घेतील- आमदार शिरसाट महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल येऊन आठवडा उलटला, तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकलेलाच आहे. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्याला गेले. यानंतर ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, पक्षाने सर्व चर्चा फेटाळून लावल्या. दरम्यान, शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, शिंदे यांना कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जातात. उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment