जळगाव: चार दिवसांवर नाशिक पदवीधर मतदारसंघांची निवडणूक येवून ठेपली आहे. मात्र सत्यजित तांबे यांना पाठींबा देण्याबाबत भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. यावर जळगाव दौऱ्यावर असलेल्या सत्यजित तांबे यांना विचारले असता, त्यांनीही चुप्पी साधली आहे. राजकीय विषयावर योग्य वेळी बोलेल, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी बोलणे टाळले. नेमक सत्यजित तांबे यांच्या चुप्पी साधण्यामागचं नेमक कारण काय यावरुन आता वेगवेगळया राजकीय चर्चांना उधाणं आलेलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. जळगावातील लेवाभवन येथे गुरुवारी त्यांचा प्रचाराचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर तांबे हे पत्रकारांशी बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचा, तरुणांचा तसेच मोठा प्रतिसाद मला मिळत असल्याचेही यावेळी सत्यजित तांबे म्हणाले.

वाचा-पृथ्वी शॉपेक्षा धोकादायक आहे हा कोहली; फक्त गोलंदाजांची धुलाई नाही तर विकेट देखील घेतो

काँग्रेसचा राजीनामा दिल्याच्या विषयावर विचारले असता, सत्यजित तांबे यांनी यावेळी बोलणार असल्याचं उत्तर दिले. तर भापचा पाठींबा यासह इतर राजकीय विषयावरही सत्यजित तांबे यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता याबाबत आपण नंतर आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगत तांबे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळले.

वाचा- ‘उजेड’ नावाचे गाव; महाराष्ट्रातील या गावात भरते आगळीवेगळी गांधी बाबाची जत्रा!

जे निवडणूक येतात, त्यांना परत बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे यासाठी आण्णा हजारे प्रयत्न करत आहे. यावर तांबे यांनी आण्णा हजारे यांचे समर्थन केले. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच याच्यावर अविश्वास दाखल होतो, पण आमदारांवर होत नाही, त्यामुळे त्यांची चूक झाली तर त्यांना परत बोलावण्याचा अधिकार असला पाहिजे, आण्णा हजारे यांच्या मताशी मी सहमत असल्याचं सत्यजित तांबे यावेळी म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *