नवी दिल्ली:SBI KYC: भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या युजर्सना अनेक सुविधा पुरवते. यापैकी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे केवायसी. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि तुम्ही अद्याप केवायसी केले नसेल, तर तुमचे खाते गोठवले जाऊ शकते म्हणजेच बंद केले जाऊ शकते. त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही. KYC तपशील अपडेट करण्याची सुविधा आता ऑनलाइन सुरू झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना शाखेत न जाता घरून KYC कागदपत्रे पाठवता येतात. तुमचे खाते अनफ्रीझ करण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी, तुम्हाला KYC करणे आवश्यक आहे. भारतभर कोविड-19 आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून, SBI बँकेने KYC कागदपत्रे ऑनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली.

वाचा: Bottle Cooler: या बॉटलमध्ये लगेच होते पाणी थंड, किंमत फक्त २७९ रुपये, बॉटलमध्ये फिट आहे कूलर सारखे डिव्हाइस, पाहा डिटेल्स

ऑनलाइन केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे: पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड, पॅन कार्ड

अल्पवयीन व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे: जेथे अल्पवयीन व्यक्तीचे वय १० वर्षांपेक्षा कमी आहे, अकाउंट चालविणाऱ्या व्यक्तीचा ओळखपत्र पुरावा सादर करावा लागेल.

वाचा: Sunder Pichai : लाखो तरुणांचे फेव्हरेट Google चे सीईओ सुंदर पिचाई यांचे ‘मॉर्निंग रूटीन आहे खूपच सिम्पल, पाहा डिटेल्स

अनिवासी भारतीयांसाठी आवश्यक KYC कागदपत्रे: परराष्ट्र कार्यालय, नोटरी पब्लिक, भारतीय दूतावास संबंधित बँकांचे अधिकारी ज्यांच्या स्वाक्षऱ्या बँकेच्या अधिकृत (A/B श्रेणी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ब्रँच) शाखेद्वारे पडताळण्यायोग्य आहेत.

केवायसी करण्यासाठीसर्वप्रथम ग्राहकांना त्यांचा पत्ता पुरावा आणि ओळखीचा पुरावा स्कॅन करावा लागेल आणि तो त्यांच्या शाखेच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवावा लागेल. ई-मेल फक्त नोंदणीकृत ईमेलवरून पाठवायचा आहे. जर तुमचा केवायसी दस्तऐवज पूर्ण झाला नसेल तर तुम्ही केवायसी दस्तऐवज ऑनलाइन पाठवा. जी कागदपत्रे पाठवायची आहेत, त्यात तुमचा पत्ता पुरावा सोबत पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड, पॅन कार्ड. अल्पवयीन व्यक्तीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास ते खाते चालवणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र द्यावे लागेल. खातेधारकाचे वय १० वर्षांपेक्षा जास्त असेल, तेव्हा त्यांना इतर सर्वांप्रमाणे KYC कागदपत्रे देखील प्रदान करावी लागतील.

वाचा: Airtel युजर्ससाठी बॅड न्यूज, वर्षभर चालणाऱ्या लोकप्रिय प्लानमध्ये आता मिळणार नाहीत ‘हे’ फायदे, पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.