म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऑनलाइन व्यवहारातील अज्ञानामुळे सर्वसामान्य नागरिकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. काळाचौकीमध्ये अशाच प्रकारे एका पोलिसालाच गंडा घालण्यात आला आहे. डेबिट कार्डची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने तथाकथित बँक प्रतिनिधीने पोलिसाच्या खात्यामधील साडेचार लाख रुपये परस्पर वळते केले. सायबर फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या काळाचौकी येथील कॉन्स्टेबलच्या ॲक्सिस बँकेच्या डेबिट कार्डची मुदत संपली होती. त्याला नुकतेच नवीन डेबिट कार्ड मिळाले होते. शनिवारी त्यांच्या मोबाइलवर एक संदेश आला. तुमच्या जुन्या डेबिट कार्डची मुदत संपली असून, तुम्हाला नवीन कार्ड देण्यात आले आहे. नवीन कार्ड सुरू करण्यासाठी काही मदत हवी असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा, असे या संदेशात म्हटले होते.

५० रुपयांत गोल्डन थाळीचा मोह ३८ हजारांना पडला, पाच महिन्यांनी आरोपींना अहमदाबादमधून अटक
कॉन्स्टेबलने त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधताच, आपण बँकेचे प्रतिनिधी बोलत आहोत, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. ‘तुम्हाला पाठविण्यात आलेल्या संदेशामध्ये एक लिंक देण्यात आली असून या लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा’ असे या कथित बँक प्रतिनिधीने पोलिसाला सांगितले.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

पोलिस कॉन्स्टेबलने त्या लिंकवर क्लिक करून, बँकेच्या नावाशी साधर्म्य असलेले एक ॲप डाऊनलोड केले. लॉगइन आयडी, पासवर्ड तसेच इतर माहिती भरत असताना समोरील प्रतिनिधीने पोलिसाला मोबाइलची स्क्रीन शेअर करण्यास सांगितली. स्क्रीन शेअरिंग केल्यानंतर डेबिट कार्ड आणि बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आली. यावेळी मोबाइलवर आलेले सर्व ओटीपी स्क्रीन शेअरिंगमुळे समोरच्या बँक प्रतिनिधीच्या नजरेस पडले. या माहितीचा वापर करून त्याने पोलिसाच्या कार्डमधून साडेचार लाख रुपये परस्पर वळते केले. फोनवरचे बोलणे संपल्यानंतर पैसे वजा होत असल्याचे संदेश फोन येऊ लागले ते पोलिसाने पाहिले. खात्यातून पैसे गेल्याचे कळताच पोलिसाने १९३० हेल्पलाइनवर आणि काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

शहरावर धुराची काजळी, फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली, प्रदूषणात पुण्याचा पहिला नंबर
Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *