सेबीने कागदी स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्यांसाठी नियम सोपे केले असून या अंतर्गत पॅन, केवायसी तपशील आणि ‘नॉमिनेशन’ शिवाय सिक्युरिटीजवरील बंदीची तरतूद काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा नियम तात्काळ लागू करण्यात आल्याचे भांडवली बाजार नियामक सेबीने एका परिपत्रकात म्हटले आहे.
सेबीचा गुंतवणूकदारांना दिलासा
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने एका परिपत्रकात म्हटले की नियम सुलभ करण्याचा त्यांचा यामागचा उद्देश असून हे पाऊल तात्काळ लागू होणार आहे. रजिस्ट्रार असोसिएशन ऑफ इंडिया आणि गुंतवणूकदारांकडून सूचना मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वीचा नियम काय होता?
यापूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांमध्ये भौतिक (फिजिकल) म्हणजे कागदाच्या स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्वांसाठी पॅन, नामांकन, संपर्क तपशील, बँक खाते तपशील आणि संबंधित फोलिओ क्रमांकासाठी नमुना स्वाक्षरी देणे बंधनकारक होते. यावर्षी मे मध्ये सेबीने सांगितले होते की फोलिओमधून इश्यू आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) प्रतिबंधित करणे आवश्यक आहे ज्यामध्ये असे कोणतेही दस्तऐवज १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा नंतर उपलब्ध होणार नाहीत.
मे महिन्यात नियामकाने जारी केलेल्या परिपत्रकात सुधारणा करताना सेबीने सांगितले की, ‘फ्रीज’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. तसेच मार्चमध्ये सेबीने सर्व डिमॅट खातेधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत नामांकन किंवा एक्झिट एनरोलमेंट सादर करणे बंधनकारक केले होते. यानुसार नोंदणी न केल्यास तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ गोठवला (फ्रीज) जाऊ शकतो.