मुंबई: अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. विविध मालिका आणि चित्रपटांमधून काम केल्यानंतर अमृताने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमधून विशेष लोकप्रियता मिळवली. या पर्वानंतर अभिनेत्रीच्या चाहता वर्गामध्येही कमालीची वाढ झाली. दरम्यान अभिनेत्री बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या जगात सक्रिय झाली असून अलीकडेच तिने एक फोटो शेअर केला. अभिनेत्रीने मंगळसूत्र घातलेला फोटो शेअर केला आहे. पहिल्यांदा फोटो पाहिल्यानंतर असा संभ्रम निर्माण होऊ शकतो की अमृताने लग्न केले की काय? मात्र तिने फोटोला दिलेले कॅप्शन वाचल्यानंतर खऱ्या गोष्टीचा उलगडा होतो.

ते माझ्या करिअरमधील सर्वात कठीण दिवस; मराठी अभिनेत्रीला रस्त्यावर द्यावी लागलेली ऑडिशन
अमृताने शेअर केलेल्या फोटोवर एका चाहत्यानेही कमेंट केली आहे की, ‘मला वाटले की तू लग्न केले की काय…’, अन्य एका युजरने लिहिले की, ‘लाल साडी, खुले केस, मंगळसूत्र, ओठावर तीळ… बस्स यहाँ हम पिघल गए’. अभिनेत्रीच्या फोटोवर इन्स्टाग्रामवरील तिच्या अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर विविध फॅन पेजकडूनही अमृताचा हा फोटो शेअर करण्यात आला.


आगामी नाटकामध्ये आहे अमृताचा असा लूक

अमृताने हा फोटो शेअर करता असे लिहिले की, ‘नियम व अटी लागू. फक्त फोटो लाइक करून चालणार नाही, तिकिटं लगेच बुक करा. लिंक बायोमध्ये आहे.’अर्थात अभिनेत्रीचा हा लूक तिचे आगामी नाटक ‘नियम व अटी लागू’मधील आहे. लग्नाला पाच वर्षं पूर्ण होत असलेल्या आजच्या काळातील एका तरुण जोडप्याची कहाणी या नाटकात दाखवली जाणार आहे. हे नवंकोरं नाटक १८ मार्चपासून रंगभूमीवर आलं असून सध्या या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सुरू आहे. हे एक कौटुंबिक, विनोदी नाटक असून संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार या नाटकात आहेत.

MaTa Cafe: ‘नागराज मंजुळे आकाशला सिनेमात घेतोच…’, त्या वक्तव्यावर दिग्दर्शकाचं स्पष्ट उत्तर
‘नियम व अटी लागू’ या नाटकाचं लेखन संकर्षणचं असून प्रशांत दामले यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. रंगभूमिवर एकापेक्षा एक नाटकांचे दिग्दर्शन करणारे चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *