रामदास कदमांना एकनाथ शिंदे यांचा फोन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील वादाची दखल घेतली आहे. गजानन कीर्तिकर यांनी देखील हा वाद सुरु झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं कळतंय. आता मुख्यमं६ी एकनाथ शिंदे यांनी थेट रामदास कदम यांना फोन करुन भेटायला बोलावल्याचं कळतंय. आज सायंकाळी ६ वाजता रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतील, अशी माहिती आहे.
मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन वादाचा भडका
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गजानन कीर्तिकर हे रामदास कदम यांच्या समर्थनाची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर रामदास कदम हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. गजानन कीर्तिकर यांनी उशिरानं एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता. रामदास कदम यांनी मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघ आणि त्यांचा मुलगा सिद्धेश कदम यांचा मुद्दा मांडल्यानं गजानन कीर्तिकर संतापले. गजानन कीर्तिकर हे तिथले विद्यमान खासदार आहेत. मुंबई पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरुन सुरु झालेल्या वादाचा भडका उडाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
अमोल कीर्तिकर लोकसभेला विजयी होणार : अनिल परब
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आम्ही देखील गजानन कीर्तिकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आता आम्ही अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देणार आहोत. गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम एकत्र झाले तरी अमोल कीर्तिकर हेच विजयी होतील, असं अनिल परब म्हणाले. अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांचे पुत्र असून ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. Read And