रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी येईल-उपसंचालक महेंद्र ढवळे:शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय
रेशीम शेती व्यवसाय शेतीस पूरक व्यवसाय म्हणून न करता तो मुख्य व्यवसाय म्हणून करावा. रेशीम शेती हा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या अडीअचणी दूर होतील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनात समृध्दी येईल त्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी असे आवाहन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले. रेशीम संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे विभागस्तरीय रेशीम रत्न पुरस्कारांचे प्रदान यशस्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना यशदा येथे आयेाजित कार्यक्रमात ढवळे यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर, प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक कु.डॉ.कविता देशपांडे, कृषी विभागातील प्रक्रिया विभागाचे उपसंचालक सुनिल बोरकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, अधीक्षक अविनाश खडसने यावेळी उपस्थित होते. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे असे सांगून या योजनांचा लाभ घेऊन मोठया संख्येने शेतकरी लखपती झाले असल्याचे ढवळे म्हणाले. आज रेशीम उद्योगातील शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनाविषयी शास्त्रोक्त माहिती होण्यासाठी एका क्लिकवर रेशीम नकाशा तयार करण्यात आला आहे. याचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रेशीम रत्न पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रवास रेशीम पिकाची काडी लावण्यापासून माडीपर्यत व माडीपासून गाडीपर्यत आणि आता तर परदेशवारी असा प्रवास होत असल्याची माहिती त्यांनी दिली. रेशीम उत्पादनात अडचणी असल्या तरी त्या फक्त काही काळासाठी असतात, त्यासाठी शासनातर्फे वेळोवेळी मदत करण्यात येते. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून त्यांचे उत्पन्न वाढीसाठी शासन नेहमी मदत करते, त्यासाठी रेशीम शेती करावी असे आवाहन केले. पुढील काळात राज्यात सुमारे पन्नास हजार एकरावर रेशीम शेती करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल. राज्यात अनेक शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पादन घेत आहेत. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेतीची कामे करताना त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी धुरळणीसाठी आरोग्य किट आणि विविध साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्याची मागणी करत आहे. याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन ढवळे यांनी दिले.