हॉटेलचालकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली
आत्महत्येपूर्वी आदित्यने टिव्ही, दरवाजासह भिंतींवर अनेक संदेश लिहिले. हे संदेश त्याने कुटुंब आणि मित्रांसाठी लिहिले आहेत. एका संदेशात त्याने लिहिले आहे की, मी सर्व दरवाजे उघडले आहेत. सर्वप्रथम माझ्या मृत्यूची माहिती पोलिसांना द्या. माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. सुसाईड नोटमध्ये त्याने स्वत:ला सिद्धू मुसेवालाचा चाहता असल्याचं सांगितले आहे.
आत्महत्येपूर्वी मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी केल्या
आदित्यने एका निळ्या पिशवीवर लिहिले की यात काही भेटवस्तू ठेवल्या आहेत. ज्या मी माझ्या मित्रांसाठी गोव्याहून आणल्या होत्या, पण त्यांना देऊ शकलो नाही. माझ्या सर्व मित्रांना या भेटवस्तू द्या. कोणती भेट कोणाला द्यायची आहे, त्यावर मित्राचे नाव लिहिलेले आहे. ज्या पिस्तुलाने त्याने आत्महत्या केली ते पिस्तूल २०१६ मध्ये बेकायदेशीररीत्या विकत घेतल्याचे सांगितले जात आहे.
हॉटेल चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिस स्टेशन प्रभारी पप्पू लाल शर्मा यांनी सांगितले की, मारुती नगरमध्ये राहणाऱ्या आदित्यने आत्महत्या केली आहे. त्याने पिस्तुलातून गोळी झाडली. घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे.आम्ही सर्व बाजूंचा तपास करत आहोत. बेकायदा शस्त्र कुठून आले याचाही तपास सुरू आहे.