मोहम्मद शमीच्या शानदार कामगिरीवर पोलिसांची चर्चा व्हायरल
संपूर्ण देश या विजयाचा आनंद साजरा करत असून, सोशल मीडियावरही हा जल्लोष साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर तर चाहत्यांनी धुमाकूळ घातला आहे. चाहते मेसेज, व्हिडिओ आणि मीम्सच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यामध्ये कोणीच मागे राहिले नाही, ना चाहते, ना सेलिब्रिटी, ना विविध क्षेत्रातील खेळाडू; सगळेच भारताच्या विजयात सामील झाले आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताच्या नेत्रदीपक विजयानंतर मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यात सोशल मीडियावर रंजक चर्चा रंगली.
दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर एक पोस्ट करत म्हटले, “मुंबई पोलिस आशा आहे की तुम्ही आज रात्रीच्या हल्ल्यासाठी मोहम्मद शमीवर गुन्हा दाखल करणार नाही.”
दिल्ली पोलिसांच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी तत्काळ मजेशीर उत्तर दिले आणि लिहिले, “तुम्ही असंख्य लोकांची मने जिंकण्याच्या गंभीर आरोपांचा उल्लेख करण्यात आणि काही सहआरोपींची यादी करण्यात अपयशी ठरला आहात.”
थोड्या वेळाने, मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त, देवेन भारती देखील मजेदार संभाषणात सामील झाले आणि त्यांनी लिहिले, “अजिबात नाही, दिल्ली पोलिस. हे “स्व-संरक्षणाचा अधिकार” अंतर्गत संरक्षणाखाली येते.
मोहम्मद शमीने उपांत्य फेरीत ५७ धावांत ७ विकेट घेतले आणि आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवला. शमीची गोलंदाजीची ५७/७ ही वनडे सामन्यातील कोणत्याही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी आहे.