मुंबई- बॉलिवूडमधला चॉकलेट हिरो, कपूर घराण्यातील पाचव्या पिढीचा तरुण अभिनेता रणबीर कपूर ची चर्चा नाही असा एकही दिवस जात नाही. कधी त्याच्या ब्रेकअपमुळे तर कधी त्याने जीव ओतून केलेल्या भूमिकांमुळे रणबीर लक्ष वेधून घेण्यात बाजी मारतोच. आलिया भट्ट शी पाच वर्षाच्या रिलेशनशीपनंतर दोन महिन्यांपूर्वी त्यानं लग्न केलं. आलिया आणि रणबीर यांच्या लग्नसोहळा खूपच गाजला. ज्या सिनेमामुळे ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यात एकत्र आली त्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलर जोरदार गाजत आहे.

करण जोहरकडून ५ कोटी उकळण्याचा होता प्लॅन, सौरभ महाकाळने सांगितलं सुशांतशी असणारं कनेक्शन!

एकीकडे रणबीरच्या ब्रह्मास्त्र सिनेमाच्या चर्चेनं धुरळा उडवला असतानाच त्याचा एक नवा लुक समोर आला आहे. मानेपर्यंत रुळणारे केस, वाढलेली दाढी आणि चेहऱ्यावर धगधगता राग या रुपातील रणबीर सोशल मीडियावर झळकला आणि पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. रणबीरचा हा लुक त्याच्या आगामी शमशेरा या सिनेमासाठी असल्याचंही समोर आलंय.

२२ जुलै रोजी शमशेरा प्रदर्शित होणार असला तरी रणबीरचा वेगळा लुक त्याच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे. हिंदी भाषेसह तमिळ आणि तेलुगू भाषेतही हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं शूट चार वर्षापासून सुरू होतं अखेर हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी तयार असल्याचं निर्मात्यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. रणबीरनेही त्याचा हा नवा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आता ४७ वर्षीय शिल्पा शेट्टीचा जडला तरुण अभिनेत्यावर जीव
‘सावरिया’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या रणबीरची लव्हबॉय अशी इमेज ऑनस्क्रिन नेहमीच यशस्वी झाली आहे. सुरूवातीच्या काळात लव्हस्टोरीमध्ये रमणाऱ्या रणबीरने वेगळया विषयावरचे सिनेमे करून त्याच्यातील ताकदीच्या अभिनेत्याचं दर्शन घडवलं. संजू या सिनेमाने त्याला अधिकच लोकप्रिय केलं. विनोदीपंच ते गंभीर भूमिकामध्ये रणबीरने बाजी मारली.सध्या रणबीरचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहेच पण अॅनिमल या सिनेमाचंही तो शूटिंग करतोय.


एकीकडे ब्रह्मास्त्र सिनेमा कधी एकदा पाहतोय याकडे लक्ष लागलेल्या नेटकऱ्यांच्या नजरेला नुकताच रणबीरचा समेशरा सिनेमाचा लुक दिसला आणि याचीच चर्चा सुरू झाली. या लुकमध्ये रणबीर खूपच वेगळा दिसत असल्याने त्याची ही भूमिका कशी असेल याचे वेध लागले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणबीरचे केस मानेपर्यंत आहेत. दाढी वाढलेली आहे. कपाळावर जखमेची खूण आहे. हातात कुऱ्हाड आणि चेहऱ्यावर राग. या लुकमधूनच त्याची भूमिकाही तगडी असेल असं चाहत्यांना वाटतय. खिलजी का बाप आ रहा है असं म्हणत चाहत्यांनी या लुकचं कौतुक केलंय.

‘चला हवा येऊ दया साठी ‘कियारा-वरुणचा मेट्रो प्रवास

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.