शरद पवार हे जातीयवादाचे विद्यापीठ:लिंबाचे झाड गोड फळ देत नाही, जसा बाप तशी लेक, गोपीचंद पडळकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका
शरद पवार हे जातीयवादाचे विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळे शिकल्या, लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. जसा बाप तशीच लेक, अशा कडवट शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार व त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीने कसे टार्गेट केले
जात आहे. यांच्यावर हल्ला केला जातोय, तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसे पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचे, काही पत्रकारांना हाताशी धरायचे आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची, असे त्यांनी म्हटले आहे. शाहू महाराजांच्या वारसांना संधी दिली नाही गोपीचंद पडळकर म्हणाले की, स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे आणि जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमतायेत असे विधान द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा देण्याआधी शाहू महाराजांच्या वारसांना यांनी कधीही खासदारकी दिली नव्हती असा आरोप त्यांनी केला. जसा बाप तशीच लेक गोपीचंद पडळकर म्हणाले की,जरांगे, शिंदे आणि पवार हे तिघही मराठा म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलायचे नाहीत, असे सुप्रिया सुळे बोलल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इथे महायुती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार हे जातीयवादाच विद्यापीठ आहे. जसा बाप तशीच लेक. सुप्रिया सुळे ह्या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या आहेत. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करूच नका. पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादीच्याच चर्चा घडवायच्या हे पवारांचे जुनेच फॅार्म्युले आहेत.
हे ही वृत्त वाचा शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं:सुप्रिया सुळे यांच्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या स्पष्ट सूचना सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ‘शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं’, अशी टॅगलाईन देत प्रवक्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाचा सविस्तर