शरद पवार म्हणाले- तुम्ही समरजित घाटगेंना आमदार करा:आम्ही त्यांना मंत्री करू, कागलमधील काहींना मोठं केलं, पण संकट काळात ते पळून गेले
समरजित घाटगे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी मंगळवारी हाती घेतली. कागलमधील गैबी चौकात घाटगे यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवारांनी घाटगेंच्या उमेदवारीचीच घोषणा केली. “तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू”, अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केली. मुश्रीफ लाचार, त्यांना जागा दाखवणार कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही, तसा इथला इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पवारांनी दिला. पवार म्हणाले की, या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही सर्वकाही दिलं. पण संकट आल्यानंतर साथ सोडून भलत्याच्या मागे गेले. त्यांच्यावर ईडीच्या काही चौकशा सुरू केल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कुटुंबीयांतील भगिनींनी ईडीने आम्हाला गोळ्या घालाव्या अशी भूमिका घेतली. पण त्यांचा कुटुंबप्रमुख लाचार होऊन भ्रष्टाचाऱ्यांच्या दारी गेला. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. घाटगेंचा पक्षप्रवेश ही परिवर्तनाची नांदी आहे. आता राज्यात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असंही शरद पवार म्हणाले. आजची सभा वेगळी पवार पुढे म्हणाले, या आधी अनेकदा गैबी चौकात सभा घेतल्या, पण आजची सभा ही वेगळी असून नजर जाईपर्यंत माणसांची गर्दी दिसतेय, शेवटचं टोक एसटी स्टँडपर्यंत आहे. त्यावरून कागलमधील तरूणापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनीच समरजीत घाटगेंच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चय केल्याचं दिसतंय. सत्तेसाठी जर कुणी गायब झालं असेल तर त्याला शाहू महाराजांच्या विचाराच्या कोल्हापूरकरांनी धडा शिकवला, कधीही लाचार होणार नाही असा संदेश दिला. आज या प्रसंगी माझ्या दोन जुन्या सहकाऱ्यांची म्हणजे बाबासाहेब कुपेकरांची आणि सदाशिवराव मंडलिकांची आठवण येते. 1980 साली आपल्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते. नंतर त्यातील पाच सहा सोडले तर सगळे निघून गेले. कार्यकर्ते नव्हते, आमदार नव्हते. पण जिद्द होती. त्यामुळे पुन्हा एकदा पक्ष उभा केला. त्यावेळी पहिल्यांदा बाबासाहेब कुपेकर आणि मंडलिक आमच्यासोबत आले आणि पाच वर्षांत राजकारण बदललं. सत्तेसाठी जर कुणी गायब झालं असेल तर त्याला कोल्हापूरकरांनी धडा शिकवला, कधीही लाचार होणार नाही असा संदेश दिला. आज महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून रोज त्याच्या बातम्या येतात. लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. पण केंद्र सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नाही असेही पवार म्हणाले.