शरद पवार, उद्धव ठाकरे प्रचंड सतर्क:संभाव्य फूट अन् ​​​​​​​दगाफटका टाळण्यासाठी उमेदवारांकडून लिहून घेतली शपथपत्र, फुलप्रुफ सुरक्षा

शरद पवार, उद्धव ठाकरे प्रचंड सतर्क:संभाव्य फूट अन् ​​​​​​​दगाफटका टाळण्यासाठी उमेदवारांकडून लिहून घेतली शपथपत्र, फुलप्रुफ सुरक्षा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतरचा संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी उमेदवारांकडून शपथपत्र लिहून घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीने आपली एकजूटता राखण्यासाठी फुलप्रुफ सुरक्षा केल्याचे दिसून येत आहे. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आज जाहीर होत आहे. सुरुवातीच्या कलात भाजपप्रणित महायुतीने महाविकास आघाडीवर काठावरची आघाडी घेतली आहे. या दोन्ही आघाड्यांतील अंतर क्षणोक्षणी बदलत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी भूतकाळातील कटू आठवणी टाळण्यासाठी म्हणजे आमदारांची संभाव्य फाटाफूट टाळण्यासाठी मोठी काळजी घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने व शिवसेनेच्या ठाकरे गटाने पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी आपल्या सर्वच उमेदवारांकडून शपथपत्र लिहून घेतली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, बुधवारी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत या दोन्ही पक्षांनी विद्यमान आमदार व उमेदवारांकडून अशी प्रतिज्ञापत्र लिहूनी घेतली आहेत. पक्षफुटीचा भूतकाळातील अनुभव ध्यानी घेता ही सावधगिरी बाळगली जात आहे. ठाकरे व पवारांच्या पक्षांत पडली होती फूट उल्लेखनीय बाब एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबत सेनेचे 40 हून अधिक आमदार गेले होते. त्यानंतर त्यांना शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हही मिळाले होते. त्यानंतर वर्षभरातच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष व चिन्ह मिळाले होते. या दोन्ही पक्षांतील या फुटीमुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. या घटनाक्रमानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीतूनच एकप्रकारे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणती? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे आजच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. अंतिम निकाल पाहा दिव्य मराठी अ‍ॅपवर महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवरील मतमोजणीचे वेगवान अपडेट्स व अंतिम निकाल तुम्हाला दिव्य मराठी अ‍ॅप व संकेतस्थळावर पाहता येतील.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment