ज्या मतदारसंघात मविआचे 2 अर्ज तिथे लवकरच मार्ग काढू:6 नोव्हेंबरपासून प्रचार करणार, राज्यातील जनता आम्हाला साथ देईल- शरद पवार
राज्यातील निवडणूक बघितली तर जिथं दोन अर्ज भरले आहेत तिथे आज आणि बसून मार्ग काढू असं शरद पवार म्हणाले. लोकांनी पाठिंबा द्यावा अशी परिस्थिती निर्माण करतील. राहुल गांधी, मी असेल आणि शिवसेना एकत्र येऊन प्रचाराची मोहीम सहा तारखेला सुरू होईल. महाराष्ट्रची जनता आम्हाला साथ देईल दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. एकमेकांची सुख, दुःखं सांगतात. मला खात्री आहे महाराष्ट्रातली जनता दीपावलीच्या प्रसंगी समाधान आणि आनंदाने एकत्र येतील. मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. जनतेचा आत्मविश्वास वाढो अशा सदिच्छा व्यक्त करतो असं शरद पवार म्हणाले. तोडगा निघेल शरद पवार म्हणाले की, ज्या मतदारसंघात मविआच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्या मतदारसंघात मार्ग काढला जाईल. जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये मी नाही आमची दुसरी लोकं त्या प्रक्रियेमध्ये आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहिल्यास राज्यातील दहा ते बारा जागांवर दोन उमेदवार दिले असल्याचा पाहायला मिळत आहे. आज उद्या दोन दिवसांमध्ये या जागांवर सर्व मित्र पक्षातील नेते बसतील आणि तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर 6 नोव्हेंबरपासून मी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि इतर सर्व नेते प्रचार करणार आहोत. राज्यातील जनता आम्हाला साथ देईल. तर सिंचन घोटाळ्यावर प्रश्न केला असता आज चांगला दिवस आहे म्हणत त्यांनी बोलणे टाळले. नक्कल हा शरद पवारांचा अधिकारच- अजित पवार अजित पवारांच्या भावनिक होण्याची शरद पवारांनी बारामतीत यथेच्छ टिंगल करत नक्कलही केली. त्याला प्रत्युत्तरात उपरोधिक टोला लावत अजित पवार म्हणाले, की नक्कल करणे हा तर शरद पवारांचा अधिकारच आहे. शिवाय नकलेतील एक चूकही काढली. बुधवारी अजित पवारांनी असा दावा केली ती नक्कल मी पाहिली नाही. पण माझ्या कानावर आलं. नक्कल करणं तर त्यांचा अधिकारच आहे. इतके दिवस मला वाटत होतं की राज ठाकरेच नक्कल करतात. पण आता दुसरे समोर आले. माझ्या मनाला वेदना झाल्या. कारण शरद पवारांना मी दैवत मानलं, शरद पवार महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात उंचीवर आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे असलेल्याची नक्कल करणं अनेकांना आवडलं नाही.