पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या असता, मोदींनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली होती. पंतप्रधानांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात शरद पवार यांनी दोनच शब्दात पंतप्रधानांनी केलेल्या चौकशी बद्दल आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यानंतर शरद पवार आज अहिल्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी त्यांचा ‘आभारी आहे’ असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती. याबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर पत्रकारांनी शरद पवार यांना या संबंधीचा प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी केवळ दोन शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे अजित पवार यांच्याबरोबर महायुती म्हणजेच एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांची नरेंद्र मोदी यांनी केलेली विचारपूस आणि शरद पवार यांनी दिलेले उत्तर याबाबत आता चर्चा रंगली आहे. हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास हवामान खात्याकडून आलेले माहिती चांगली आहे. अजून पाऊस झाला नसला तरी चिंता करण्याचे कारण नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आणि अलीकडच्या काळातील अनुभव पाहता हवामान विभाग जे सांगते, तीच वास्तविकता मोठ्या प्रमाणात असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांचा राजीनामा आणि नवा अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वतः नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचे सुचवले आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते हे पद सांभाळत आहेत. त्यामुळे याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. आता पुढील काळात बघूयात, अशा शब्दात शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या पुढाकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्या राजी नामाच्या तयारी नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल? याबाबत चर्चा रंगली आहे. आमदार शशिकांत शिंदे तथा राजेश टोपे यांचे नाव प्रामुख्याने पुढे येत आहे.