पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट घेऊन भाजप शिवसेनेला साथ देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः मैदानात उतरत पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. त्यातच आता शरद पवार यांनी थेट विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून शरद पवार यांच्या गटाचा पुण्यातील पहिला उमेदवार ठरल्याचं समोर येत आहे.

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहरात हडपसर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचा हुकमी एक्का आणि शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या एका बैठकीत शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. २०१९ मध्ये देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रशांत जगताप इच्छुक होते. मात्र हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे यांना संधी देण्यात आली. आता प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ दिल्यानंतर स्वतः प्रशांत जगताप यांनी पुन्हा एकदा हडपसरमधून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर जगताप यांना तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही, मनोज जरांगे पाटील अजित पवारांना काय म्हणाले?
साहेबांचा आदेश, आता निवडणूक लढणार आणि जिंकणार देखील!

पक्षाने ४० लोकांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघामध्ये पक्षाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. मी हडपसर मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक असून निवडणूक लढवणार आहे. २०१९ मध्ये देखील मी इच्छुक होतो पण संधी मिळाली नाही, मात्र यावेळेस हडपसर लढवणार आणि जिंकणार देखील, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’शी बोलताना व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरेंना विजयाची खात्री असलेल्या लोकसभा मतदारसंघातच धक्का, बड्या नेत्याचं राजीनामास्त्र, कारण…
दादा की साहेब? चेतन तुपे यांचं काही ठरेना!

दरम्यान, हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर चेतन तुपे नक्की साथ कोणाला देणार याचा संभ्रम अजूनही आहे. चेतन तुपे हे कधी शरद पवार यांच्या मंचावर दिसतात तर कधी अजित पवार यांच्या मंचावर. त्यामुळे चेतन तुपे यांची भूमिका स्पष्ट होत नाही. अशातच आता प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर त्यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

हज हाऊसची उभारणी धर्मनिरपेक्ष, मिलिंद एकबोटेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
दुसरीकडे, अजित पवारांनी साथ सोडल्यानंतर शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे सांगणारे प्रशांत जगताप हे पुण्यातील पहिले पदाधिकारी होते. पुण्यातील शरद पवार यांच्या गटाची बाजू भक्कमपणे लावून धरत प्रशांत जगताप यांनी अजित पवारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना त्यांच्या निष्ठेच फळ दिले असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचे उद्धघाटन अजितदादांनी केले त्याच कार्यालयातून फोटो हटवला!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *