शेंदुर्णीत दंगल:व्यायामशाळेत दोन मुलांमधील वादाला लागले हिंसक वळण, इस्लामपुरा, कोळीवाडा गटात तुफान दगडफेक; 46 जणांवर गुन्हे

शेंदुर्णीत दंगल:व्यायामशाळेत दोन मुलांमधील वादाला लागले हिंसक वळण, इस्लामपुरा, कोळीवाडा गटात तुफान दगडफेक; 46 जणांवर गुन्हे

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे बुधवारी व्यायामशाळेत दाेन मुलांमध्ये वाद हाेऊन त्याचे रूपांतर रात्री दहा वाजता दंगलीत झाले. इस्लामपुरा, कोळीवाडा गटात झालेल्या दगडफेकीनंतर तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी वेळीच लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिसरात बंदोबस्त कायम आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी शेंदुर्णीत तळ ठोकून आहेत. दरम्यान, या प्रकरणी ४५ ते ४६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ जणांना अटक करण्यात आली. यात पोलिस कर्मचारी गुलाब पोपट पवार (वय ४३) जखमी झाले असून पोलिस वाहनावर ही दगडफेक झाली. तसेच तीन दुचाकींची तोडफाेड करण्यात आली. पाचोरा रोडवरील व्यायामशाळेमध्ये दोन मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावरण इस्लामपुरा व कोळीवाडा येथील दोन गटात दगडफेकीत झाले. त्यात दोन्ही गटातील बरेच जण जखमी झाले. वाहनांचेही नुकसान झाले. पाेलिसांनी मध्यरात्री ४६ जणांविरुद्ध दंगलीत सहभागाचा गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतल्यावर नातेवाइकांचा आक्षेप दरम्यान, पाेलिसांनी दाेन्ही गटातील एकूण १४ जणांना ताब्यात घेतले होते. यावर त्यांच्या नातेवाइकांनी आक्षेप नोंदविला. मग पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी चौकशी व पडताळणी करून अटक करण्यात येईल, असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा १४ जणांच्या अटकेची कारवाई पूर्ण केली. दोन्ही गटांचा पोलिस स्टेशनवर मोर्चा दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या दगडफेकीनंतर दोन्ही जमावातील तरुणांना पोलिसांनी आरोपी केले व काहींची धरपकड करून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी कोळीवाडा व परिसरातील शेकडो महिला व पुरुष यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेत आमच्यावर अन्याय होत असल्यामुळे न्याय मिळावा. ही मागणी केली. त्यानंतर इस्लामपुरा भागातील महिला व पुरुषांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेत दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. पाेलिसांनी दाेन्ही गटांची समजूत घातल्यानंतर ते माघारी गेले.

​जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे बुधवारी व्यायामशाळेत दाेन मुलांमध्ये वाद हाेऊन त्याचे रूपांतर रात्री दहा वाजता दंगलीत झाले. इस्लामपुरा, कोळीवाडा गटात झालेल्या दगडफेकीनंतर तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी वेळीच लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिसरात बंदोबस्त कायम आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी शेंदुर्णीत तळ ठोकून आहेत. दरम्यान, या प्रकरणी ४५ ते ४६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ जणांना अटक करण्यात आली. यात पोलिस कर्मचारी गुलाब पोपट पवार (वय ४३) जखमी झाले असून पोलिस वाहनावर ही दगडफेक झाली. तसेच तीन दुचाकींची तोडफाेड करण्यात आली. पाचोरा रोडवरील व्यायामशाळेमध्ये दोन मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावरण इस्लामपुरा व कोळीवाडा येथील दोन गटात दगडफेकीत झाले. त्यात दोन्ही गटातील बरेच जण जखमी झाले. वाहनांचेही नुकसान झाले. पाेलिसांनी मध्यरात्री ४६ जणांविरुद्ध दंगलीत सहभागाचा गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतल्यावर नातेवाइकांचा आक्षेप दरम्यान, पाेलिसांनी दाेन्ही गटातील एकूण १४ जणांना ताब्यात घेतले होते. यावर त्यांच्या नातेवाइकांनी आक्षेप नोंदविला. मग पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी चौकशी व पडताळणी करून अटक करण्यात येईल, असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा १४ जणांच्या अटकेची कारवाई पूर्ण केली. दोन्ही गटांचा पोलिस स्टेशनवर मोर्चा दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या दगडफेकीनंतर दोन्ही जमावातील तरुणांना पोलिसांनी आरोपी केले व काहींची धरपकड करून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी कोळीवाडा व परिसरातील शेकडो महिला व पुरुष यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेत आमच्यावर अन्याय होत असल्यामुळे न्याय मिळावा. ही मागणी केली. त्यानंतर इस्लामपुरा भागातील महिला व पुरुषांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेत दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. पाेलिसांनी दाेन्ही गटांची समजूत घातल्यानंतर ते माघारी गेले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment