निवडणुकांमध्ये जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल:रोहित पवार यांचा विश्वास; सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष असल्याचा दावा

निवडणुकांमध्ये जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल:रोहित पवार यांचा विश्वास; सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष असल्याचा दावा

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीचा सुपडा साफ केला आहे. यातील दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांवर टीका केली. सरकार विरोधात राज्यात माठा असंतोष असल्याचा दावा देखील त्यांनी केला. या भीतीतूनच विधानसभा निवडणूक एक महिला पुढे ढकलण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच या विजयाबद्दल आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन देखील केले आहे. दणदणीत विजय आदित्य ठाकरे यांच्या या विजयाबद्दल रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक वारंवार पुढे का ढकलली जात होती, याचं उत्तर कालच्या निकालाने स्पष्ट केलं आहे. मुंबई सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल आदित्य ठाकरे तसेच सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन. सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष आहे आणि त्या भीतीतूनच विधानसभा निवडणूक देखील एक महिना पुढे ढकलण्यात आली. तसंच मुंबई मनपाससह राज्यातील सर्वत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका अद्यापही प्रलंबित आहेत. असो या निवडणुकांमध्ये देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल हा विश्वास आहे.’
दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांचा विजय मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (एबीव्हीपी) थेट लढत झाली. त्यात दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत मनसे आणि शिंदेसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. युवा सेनेने पहिल्यांदा 2010 मध्ये सिनेटची निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये 10 पैकी 8, तर त्यानंतर 2018 मध्ये 10 पैकी 10 जागा भरघोस मताने निवडून आल्या होत्या. गेल्या 14 वर्षांपासून मुंबई विद्यापीठावर युवा सेनेचे राज्य आहे. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. उद्धवसेना हीच असली शिवसेना असल्याचे दाखवून दिल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीचा फायदा विधानसभेला होईल, असा दावाही युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. एक ना धड भाराभर चिंध्या अशी फडणवीसांची अवस्था:तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील म्हणत ठाकरे गटाचा हल्लाबोल महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व सरकारी बंगल्यांची या लोकांनी ‘फिल्मसिटी’ म्हणजे चित्रनगरीच करून ठेवली. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपात आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस हे सिंघम, अभिमन्यू, यांच्याबरोबर कथा-पटकथाकार सलीम-जावेदही होऊ इच्छित आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. या संदर्भात दैनिक सामनामध्ये ठाकरे गटाने म्हटले की, महाराष्ट्राच्या इभ्रतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या आहेत. राज्याच्या या नव्या सिंघम साहेबांनी नालासोपारा व कोरेगावच्या बलात्काऱ्यांनाही ‘बदला’पूरचाच न्याय द्यावा. नाहीतर तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील, अशी टीकाही त्यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीचा सुपडा साफ केला आहे. यातील दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांवर टीका केली. सरकार विरोधात राज्यात माठा असंतोष असल्याचा दावा देखील त्यांनी केला. या भीतीतूनच विधानसभा निवडणूक एक महिला पुढे ढकलण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच या विजयाबद्दल आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन देखील केले आहे. दणदणीत विजय आदित्य ठाकरे यांच्या या विजयाबद्दल रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक वारंवार पुढे का ढकलली जात होती, याचं उत्तर कालच्या निकालाने स्पष्ट केलं आहे. मुंबई सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल आदित्य ठाकरे तसेच सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन. सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष आहे आणि त्या भीतीतूनच विधानसभा निवडणूक देखील एक महिना पुढे ढकलण्यात आली. तसंच मुंबई मनपाससह राज्यातील सर्वत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका अद्यापही प्रलंबित आहेत. असो या निवडणुकांमध्ये देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल हा विश्वास आहे.’
दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांचा विजय मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (एबीव्हीपी) थेट लढत झाली. त्यात दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत मनसे आणि शिंदेसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. युवा सेनेने पहिल्यांदा 2010 मध्ये सिनेटची निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये 10 पैकी 8, तर त्यानंतर 2018 मध्ये 10 पैकी 10 जागा भरघोस मताने निवडून आल्या होत्या. गेल्या 14 वर्षांपासून मुंबई विद्यापीठावर युवा सेनेचे राज्य आहे. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. उद्धवसेना हीच असली शिवसेना असल्याचे दाखवून दिल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीचा फायदा विधानसभेला होईल, असा दावाही युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. एक ना धड भाराभर चिंध्या अशी फडणवीसांची अवस्था:तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील म्हणत ठाकरे गटाचा हल्लाबोल महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व सरकारी बंगल्यांची या लोकांनी ‘फिल्मसिटी’ म्हणजे चित्रनगरीच करून ठेवली. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपात आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस हे सिंघम, अभिमन्यू, यांच्याबरोबर कथा-पटकथाकार सलीम-जावेदही होऊ इच्छित आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. या संदर्भात दैनिक सामनामध्ये ठाकरे गटाने म्हटले की, महाराष्ट्राच्या इभ्रतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या आहेत. राज्याच्या या नव्या सिंघम साहेबांनी नालासोपारा व कोरेगावच्या बलात्काऱ्यांनाही ‘बदला’पूरचाच न्याय द्यावा. नाहीतर तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील, अशी टीकाही त्यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment