शिंदे-भाजपाने सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली:गृहमंत्री पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, खोटा इतिहास शिकवणे यात व्यस्त- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या गोळीबार प्रकरणावर ट्विट करत संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळतच चालली आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत, कोयता गॅंगसदृश घटना असोत की वारंवार होणारे गोळीबार महाराष्ट्रातील शहरं आणि गावं या गुन्हेगारीने ग्रासून गेलेली आहेत, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, काल तर बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाला आणि राज्याचे गृहमंत्री मात्र पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, खोटा इतिहास शिकवणे, प्रचार करणे यातच व्यस्त आहेत. आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली या शिंदे-भाजपाने, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर घणाघात केला आहे.
नेमके आदित्य ठाकरेंचे ट्विट काय? महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळतच चाललीये. स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत, कोयता गॅंगसदृश घटना असोत की वारंवार होणारे गोळीबार…. महाराष्ट्रातील शहरं आणि गावं ह्या गुन्हेगारीने ग्रासून गेलेली आहेत…. काल तर बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाला! आणि राज्याचे गृहमंत्री मात्र पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, खोटा इतिहास शिकवणे, प्रचार करणे ह्यातच व्यस्त आहेत. आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली ह्या शिंदे-भाजपाने!, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बदालपूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा गोळीबार झाला. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर हल्ला चढवला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक तरुण स्थानकावरच गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाचा सविस्तर