कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाचे काम करत आहेत, असा आरोप कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे भाजप आणि शिंदे गटात असलेली स्थानिक पातळीवरील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यापूर्वीही शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. मध्यंतरी हा वाद इतका विकोपाला पोहोचला होता की, कल्याण आणि डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर भाजप नेतृत्त्वाच्या पुढाकाराने या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र, आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पुन्हा एकदा शिंदे पिता-पुत्रांवर थेट निशाणा साधत या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे.

Video : कल्याण लोकसभेत भाजप-सेनेचं पटेना, सोशल मीडियावर वाद पेटला, धग रस्त्यावर पोहोचली, दोन्ही गट आक्रमक

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने ठाणे जिल्ह्यातील राजकारण पेटू लागले आहे. पालिका निवडणुकांसाठी अद्याप मुहूर्त सापडला नसला तरी शिंदे गटातील काही इच्छुक माजी नगरसेवक बाशिंग बांधून उभे आहेत . त्यांना वाटते की महापौर पद आपल्याला आणि आपल्या पक्षाला मिळेल. मात्र, भाजपचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी दावा ठोकत सांगितले की, पालिका निवडणूकीत भाजपाचं संख्याबळ अधिक असेल आणि महापौरही भाजपाचा बसेल. या विधानावरच मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही प्रतिक्रिया देत सांगितले की, शिंदे गटापुढे भाजपाचे काही चालत नाही,त्यामुळे शिंदे गट म्हणेल तेच होणार आहे. महापौर यांनी नंतर बसवायच्या वार्ता कराव्यात, असे विधान पाटील यांनी केलं आहे. या विधानाला कल्याण पूर्वेचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनीही पाठींबा दर्शवला आहे. मी राजू पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे, असे सांगत शिंदे पिता पुत्रांकडून राज्यात भाजप शिंदे पिता – पुत्र आणि गटाने भाजप कार्यकर्त्याच खच्चीकरण सुरु असल्याचा आरोप केला.

गणपत गायकवाड यांच्या या टीकेला शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. युवासेना सचिव आणि केडीएमसी माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी टोला हाणत सांगितले की, हेच लोक काही दिवसांपूर्वी खासदाराच्या गाडीत बसून भूमिपूजन करत होते. कल्याण पूर्वेत खासदार यांना घेऊन फिरत होते. तेव्हा यांना गळचेपी दिसली नाही का? असा टोला दीपेश म्हात्रे यांनी आमदार गणपत गायकवाड यांचे नाव न घेता लगावला. काही लोकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसेल, असे वक्तव्य केले. पण शिवसेना-भाजप अनेक वर्षांपासून युतीमध्ये आहे. राज्यामध्ये देखील युतीचं सरकार आहे. प्रत्येक माणसाने वक्तव्य करताना आपण कुठलं वक्तव्य करतोय, याचे तारतम्य बाळगले पाहिजे असा सल्लाही दीपेश म्हात्रे यांनी गायकवाडांना दिला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *