प्रशांत पुसाळकर यांनी संजय कदम यांच्यासोबत काम करण्याचा घेतलेला निर्णय एका अर्थाने हा दापोलीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला मिळालेला मोठा धक्का मानला जात आहे. प्रशांत पुसाळकर हे पूर्वी दापोली काँग्रेसचे युवक अध्यक्ष होते त्यानंतर ते काँग्रेस तालुका कार्यकारणीवर होते. दीड वर्षांपूर्वी झालेल्या दापोली नगरमध्ये निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून काँग्रेसला आव्हान दिलं होत. त्यावेळी ते आमदार योगेश कदम यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दापोली नगरपंचायतीचे काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती.
दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी त्यांच्या सहकारी सहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार संजय कदम,माजी आमदार सूर्यकांत दळवी,दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई,तालुकाप्रमुख ऋषीकेश गुजर,माजी बांधकाम सभापती विश्वास उर्फ काका कदम, नरेंद्र करमरकर,शहरप्रमुख संदीप चव्हाण,दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममताताई मोरे,नगरसेविका नौसीन गिलगिले,नगरसेवक रविंद्र शिरसागर,नगरसेवक अझीम चिपळूणकर,युवासेना शहर अधिकारी प्रसाद दरीपकर, बिपिन मोरे, उमेश शिंदे,जिल्हा युवती समन्वयक भाग्यश्री चव्हाण,युवासेना सचिव साई मोरे,समन्वयक सायली गावडे, मंगेश गावडे, सुनिल साळवी, दत्ता भिलारे, अक्षय पाटणे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी युवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.