चला शिवस्मारक शोधायला:संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पहिले आंदोलन; भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
संभाजी राजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मान्यता मिळाली आहे. आता या पक्षाच्या वतीने राज्यातील पहिले आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई जवळ असलेल्या अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे जल पूजन झाले होते. हे शिव स्मारक शोधायला चला, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती हे भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवप्रेमी नागरिकांना आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांचे कार्यकर्ते चला शिवस्मारक शोधायला या मोहिमेसाठी मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे 6 ऑक्टोबर रोजी अकरा वाजता हे सर्व एकत्र जमणार आहेत. या माध्यमातून भाजप आणि राज्य सरकारवर संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्यासह आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार या तिघांनी व्यक्त केला आहे. याचाच एक भाग म्हणून संभाजीराजे छत्रपती यांच्या या आंदोलनाकडे देखील पाहिले जात आहे. हेच का अच्छे दिन, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला देखील प्रश्न विचारले आहेत. सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह संभाजी राजे छत्रपती यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे आपल्या पक्षाची नोंदणी केली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे नाव त्यांना मिळाले आहे. इतकेच नाही तर सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह देखील त्यांना मिळाले आहे. या चिन्हावरच आगामी काळातील विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सामोरे जाणार आहे. पूर्ण बातमी वाचा….
शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. 24 डिसेंबर 2016 रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही… चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत 10% अल्पसंख्याकांना उमेदवारी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कोट्यातून अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना 10 टक्के जागा देणार आहे. पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला लोकसभा निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला चारपैकी तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे युतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पूर्ण बातमी वाचा…. पुण्यात बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले:दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती; हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील बावधन परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हेलिकॉप्टर मध्ये तीन प्रवासी असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पडल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली असल्याचे दिसून आले. त्यामुळे या हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला. पूर्ण बातमी वाचा… लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाही त्यामुळे आता गाय आणली:गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान, ठाकरे गटाचा हल्ला गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. या संदर्भात दैनिक सामनामधून ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…