शिवाजी महाराज यांनी लुट केली हे मी मान्य करणार नाही:माझा राजा लुटारू नव्हता – देवेंद्र फडणवीस
शिवाजी महाराज यांनी लुट केली हे मी मान्य करणार नाही, माझ्यावर कितीही टीका झाली तरी माझा आपला बाप चोर होता हे मान्य करणार नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरत लुटीवर पुन्हा भाष्य केले आहे. शरद पवार यांना महाराजांना लुटारु म्हणणे मान्य आहे का?, माझा राजा लुटारू नव्हता. माझ्यावर कितीही टीका केली तरी मी हे मान्य करणार नाही, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना म्हटले आहे. नेमके काय म्हणाले फडणवीस? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. त्यांनी सरत लुटली हे म्हणणे अगदी चुकीचे आहे त्यांनी सुरतेवर दोनदा स्वारी केली. लुटली हे आपण अल्लाउद्दीन खिल्जी आणि अब्दाली यांनी केली त्यांला लुट म्हणता येईल. पण शिवरायांनी सुरतमध्ये एका तरी सामान्य माणसाला हात लावला का. महाराजांनी मोगल सुभेदाराला खलिता पाठविला. तुमच्या राज्यकर्त्यांच्या वागण्यानेच मला मोठे सैन्य बाळगण्यास भाग पाडले आहे. या सैन्याला पोसण्यासाठी पैसा लागतो. त्यामुळे मोगलांनी आपल्या साऱ्याचा चौथा हिस्सा मला द्यावा.या साठी नोटीस पाठवली आणि त्यानंतर ही रक्कम वसून केली अशी पावती देखील महाराजांनी दिली याला लुट म्हणतात का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या बापाला लुटारु म्हणणारे लोक कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या बापाला लुटारु म्हणणारे कोण लोक आहेत. महाराजांना तुम्हाला कसे लुटारु म्हणता येईल, महाराजांनी कधीही सुरत लुटली नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले आहे. 1857 ची लढाई ही युद्ध नसून शिपायाचे बंड होते असे म्हणणे चुकीचे आहे, ती स्वातंत्र्यांची लढाई होती. आणि महाराजांना लुटारु म्हणणे चुकीचे आहे. शरद पवारांना महाराजांना लुटारु म्हणणे मान्य आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांना महाराजांना लुटारु म्हणणे मान्य आहे का?, माझा राजा लुटारू नव्हता. माझ्यावर कितीही टीका केली तरी मी हे मान्य करणार नाही, रयतेच्या भाजीला धक्का लागू दिला नाही. ज्या राजांनी महिलांचा आदर केला त्या महाराजांना तुम्ही लुटारू म्हणतात आणि त्यांचे समर्थन करतात याची लाज वाटली पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र सरकार संवेदनशील देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखादी चूक झाली तर माफी मागणे ही संवेदनशीलता आहे. जे संवेदनशील असतात ते महाराष्ट्रातील सरकार आहे. माफी मागण्यात कमी पणा नाही. यापुढे जर असा काही प्रसंग आला तरही आम्ही मागू असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.