शिवरायांचा पुतळा पडला की पाडला?:प्रकाश आंबेडकरांचा सवाल, म्हणाले- मोदींनी माफी मागितली पण फडणवीसांनी नाही

शिवरायांचा पुतळा पडला की पाडला?:प्रकाश आंबेडकरांचा सवाल, म्हणाले- मोदींनी माफी मागितली पण फडणवीसांनी नाही

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. तरीदेखील राज्यातील जनतेच्या प्रश्नाला महत्त्व न देता भाजप सरकार अन्य गोष्टींवर लक्ष देत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर विशेषतः भाजपवर केली आहे. लाडकी बहिण योजना ही कायम करण्याचं सरकारचे धोरण आहे. मात्र सरकार केवळ दीड हजार रुपये देऊन लोकांना गुलाम बनविण्याचे काम करत असल्याचेही आंबेडकर म्हणालेत. शिवरायांचा पुतळा पाडला की पडला?, आंबेडकरांचा सवाल सत्ताधारी स्वतःच्या विरोधातच आंदोलन करत आहेत. पंतप्रधान- मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पण गृहमंत्र्यांनी अद्याप माफी मागितली नाही, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. पुतळा पडला की पाडला यांची चौकशी व्हावी. मातीचे प्लास्टिकचे पुतळे 45 किलो मीटर हवा अली तरी हे पडले नाहीत. मग हा पुतळा नेमका का पडला? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला. आरक्षणावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ओबीसीसाठी मी दौरे करीत आहे. सर्व पक्ष अजून ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्नवरती का बोलत नाहीत. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये रोष पसरत चाललाय. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. वर्गीकरणाबरोबरच क्रिमिलियर ही अट घालण्यात आली. जे तंत्र जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला. लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा ही परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकार या परिस्थितीला कंट्रोल करण्यात फेल झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. महिलांवरील अत्याचाराला सरकार जबाबदार महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना केवळ RSS आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. हिंसेची भाषा करून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. यामुळेच समाजात सायको निर्माण होत आहेत. समाजात हिंसाचार पसरवण्यापेक्षा लालबहादूर शास्त्री यांचे धोरण का अवलंबत नाहीत. शास्त्री यांचे होत हम दोन हमारे दोन हे धोरण अवलंबण्यास कारण काय? असा सवालदेखील आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सरकारच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. भाजप-महाविकास आघाडी आंदोलन कपडे फाड कार्यक्रमाला सुरुवात होईल, सत्तेत येणे म्हणजे राज्याची तिजोरी लुटणे होय. नितीन गडकरी यांच्या खात्यातील रिपार्ट आला आहे. त्याची चर्चा कुठेही होत नाही. मनमोहनसिंग यांच्या काळातील चर्चा होते. गडकरी हे विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांची चर्चा होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राजू शेट्टी यांच्यासोबत भेट प्रकाश आंबेडकर यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, समजोता झाल्यास पाहू, देशातील आदिवासी समूहाने एकत्र लढले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करून ओबीसी आणि इतरांसोबत आघाडी करू. विभागीय बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेऊ.

​राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. तरीदेखील राज्यातील जनतेच्या प्रश्नाला महत्त्व न देता भाजप सरकार अन्य गोष्टींवर लक्ष देत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर विशेषतः भाजपवर केली आहे. लाडकी बहिण योजना ही कायम करण्याचं सरकारचे धोरण आहे. मात्र सरकार केवळ दीड हजार रुपये देऊन लोकांना गुलाम बनविण्याचे काम करत असल्याचेही आंबेडकर म्हणालेत. शिवरायांचा पुतळा पाडला की पडला?, आंबेडकरांचा सवाल सत्ताधारी स्वतःच्या विरोधातच आंदोलन करत आहेत. पंतप्रधान- मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पण गृहमंत्र्यांनी अद्याप माफी मागितली नाही, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. पुतळा पडला की पाडला यांची चौकशी व्हावी. मातीचे प्लास्टिकचे पुतळे 45 किलो मीटर हवा अली तरी हे पडले नाहीत. मग हा पुतळा नेमका का पडला? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला. आरक्षणावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ओबीसीसाठी मी दौरे करीत आहे. सर्व पक्ष अजून ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्नवरती का बोलत नाहीत. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये रोष पसरत चाललाय. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. वर्गीकरणाबरोबरच क्रिमिलियर ही अट घालण्यात आली. जे तंत्र जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला. लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा ही परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकार या परिस्थितीला कंट्रोल करण्यात फेल झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. महिलांवरील अत्याचाराला सरकार जबाबदार महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना केवळ RSS आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. हिंसेची भाषा करून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. यामुळेच समाजात सायको निर्माण होत आहेत. समाजात हिंसाचार पसरवण्यापेक्षा लालबहादूर शास्त्री यांचे धोरण का अवलंबत नाहीत. शास्त्री यांचे होत हम दोन हमारे दोन हे धोरण अवलंबण्यास कारण काय? असा सवालदेखील आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सरकारच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. भाजप-महाविकास आघाडी आंदोलन कपडे फाड कार्यक्रमाला सुरुवात होईल, सत्तेत येणे म्हणजे राज्याची तिजोरी लुटणे होय. नितीन गडकरी यांच्या खात्यातील रिपार्ट आला आहे. त्याची चर्चा कुठेही होत नाही. मनमोहनसिंग यांच्या काळातील चर्चा होते. गडकरी हे विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांची चर्चा होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राजू शेट्टी यांच्यासोबत भेट प्रकाश आंबेडकर यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, समजोता झाल्यास पाहू, देशातील आदिवासी समूहाने एकत्र लढले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करून ओबीसी आणि इतरांसोबत आघाडी करू. विभागीय बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेऊ.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment