मुंबई : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोघांपैकी कोणाला परवानगी मिळणार आहे याबाबत अजूनही निर्णय होऊ शकलेला नाही. अशात शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल असे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ठामपणे सांगत आहेत. शिवतीर्थावर परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने जंगजंग पछाडले असून शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी आज शिष्टमंडळासह मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाच्या कार्यालयाला भेट दिली.

शिवसेनेच्या या शिष्टमंडळात माजी महापौर मिलिंद वैद्यांसह महेश सावंत आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळण्यााबाबत चर्चा केली.

क्लिक करा आणि वाचा- Dasara Melava: शिवसेनेचं ठरलं! दसरा मेळावा शिवतीर्थावरच; शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा प्लॅन तयार

या अगोदरच शिवसेनेने शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी महानगरपालिकेकडे केली आहे. अशीच मागणी शिंदे गटाने देखील केली आहे. मात्र, महानगरपालिकेने अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळेच माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी महानगरपालिकेच्या निर्णयाबाबत चाचपणी करण्यासाठी आज भेट घेतली.

क्लिक करा आणि वाचा- अशोक चव्हाण यांचा प्रस्ताव पृथ्वीराजबाबांना अमान्य, राहुल गांधींच्या बिनविरोध निवडीस आक्षेप

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मिलिंद वैद्य यांनी सांगितले आहे की, शिवसेनेने महानगरपालिकेकडे केलेला अर्ज पालिका कार्यालयाने आपल्या विधी विभागाकडे पाठवला आहे. या अर्जावर विधी विभाग आपले म्हणणे लेखी देणार आहे. मात्र, काहीही असले तरी आम्ही दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेणार आहोत, असे मिलिंद वैद्य यांनीही ठामपणे सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- Narayan Rane Bungalow: राणेंच्या बंगल्यातील नेमक्या कोणत्या गोष्टी अनधिकृत, १० लाखांचा दंड का ठोठावला?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.