[ad_1]

नागपूर: शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती आखाडा परिसरात पैशाच्या व्यवहारावरून गुन्हेगारांच्या दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसघटनास्थळी पोहचली. या हत्येतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अन्य साथीदाराचा शोध सुरू आहे. विजय चव्हाण असे मृतकाचे नाव आहे. नागपूर शहरात गुन्हेगारांमधील स्पर्धेमुळे रक्तरंजित चकमकी होऊ लागल्या आहेत.
नवनीत राणा यांना ‘सुप्रीम’ दिलासा, जात प्रमाणपत्र वैध, निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा
बुधवारी सकाळी सीताबर्डी येथील आनंद नगर परिसरात पैशाच्या वादातून दोघांमध्ये भांडण झाले आणि गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर कारवाई करत सुमारे ८ आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण अद्याप संपले नसताना काल रात्री शांतीनगर येथील भारती आखाड्यात पैशाच्या व्यवहारावरून गुन्हेगारांच्या दोन गटात पुन्हा हाणामारी झाली. या घटनेत विजय चव्हाण नावाच्या गुन्हेगाराची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी हर्षल कातळे नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याचा अन्य साथीदार सागर यादव याचा शोध घेत आहेत.

चौरंगी लढतीत जिंकण्याचा आनंद वेगळा, राजू शेट्टी जिंकतीलच!; कार्यकर्त्यांना विश्वास

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर यादव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला असे सुमारे १३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी सागरचा सुजल नावाच्या तरुणासोबत पैशाच्या व्यवहारावरून वाद होता. या वादातून सुजल त्याचा मित्र विजय चव्हाण आणि अन्य दोन मित्रांसह काल रात्री सागर यादवच्या भारती आखाडा येथील घरी बोलण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. आरोपी सागरने विजयवर आपल्याजवळ असलेल्या चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. या घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला. काल रात्री उशिरा पोलिसांनी हर्षल कातळे याला अटक केली असून त्याचा साथीदार सागर यादव याचा शोध सुरू आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *