धक्कादायक VIDEO:कोयता गँग, ड्रग्स माफियांनी सुसंस्कृत पुण्याची वाट लावली; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

धक्कादायक VIDEO:कोयता गँग, ड्रग्स माफियांनी सुसंस्कृत पुण्याची वाट लावली; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर जाणाऱ्या वाहनावर रात्रीच्या वेळी कोयता गँग हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या गाडीमध्ये असलेली महिला घाबरलेल्या अवस्थेत देवाचा धावा करत असल्याचे देखील दिसून येत आहे. या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करत पुण्यात कोयता गँग आणि ड्रग्ज माफिया यांनी सुसंस्कृत पुण्याची वाट लावली असल्याचा आरोप केला आहे. तसेच पुण्याचे स्वयंघोषित नवे शिल्पकार असलेल्या गृहमंत्र्यांनी पुण्याचे मिर्झापुर करून सोडले असल्याचा आरोप देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता या अकार्यक्षम सरकारला बाजूला करून महाराष्ट्राला सुरक्षित करण्याची वेळ आली असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, ‘वारे वा सरकार आणि सरकारचे कार्यक्षम गृहमंत्री! पुण्याचे स्वंयघोषित नवे शिल्पकार असलेल्या गृहमंत्र्यांनी पुण्याचे #मिर्झापूर करूनच सोडले आहे. #कोयता गँग, ड्रग्स माफियानी सुसंस्कृत पुण्याची वाट लावली असून नागरिक अतिशय भितीत वावरत आहेत. राज्याच्या इतिहासात अशाप्रकारे कायदा- सुव्यवस्थेची लक्तरे कधी टांगली गेली नाहीत, असो अशा अकार्यक्षम सरकारला टाटा बायबाय करून महाराष्ट्राला सुरक्षित करण्याची वेळ आली आहे .’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… चला शिवस्मारक शोधायला:संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पहिले आंदोलन; भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न संभाजी राजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मान्यता मिळाली आहे. आता या पक्षाच्या वतीने राज्यातील पहिले आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई जवळ असलेल्या अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे जल पूजन झाले होते. हे शिव स्मारक शोधायला चला, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती हे भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत 10% अल्पसंख्याकांना उमेदवारी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कोट्यातून अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना 10 टक्के जागा देणार आहे. पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला लोकसभा निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला चारपैकी तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे युतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पूर्ण बातमी वाचा…. पुण्यात बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले:दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती; हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील बावधन परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हेलिकॉप्टर मध्ये तीन प्रवासी असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पडल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली असल्याचे दिसून आले. त्यामुळे या हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला. पूर्ण बातमी वाचा… लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाही त्यामुळे आता गाय आणली:गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान, ठाकरे गटाचा हल्ला गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. या संदर्भात दैनिक सामनामधून ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर जाणाऱ्या वाहनावर रात्रीच्या वेळी कोयता गँग हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या गाडीमध्ये असलेली महिला घाबरलेल्या अवस्थेत देवाचा धावा करत असल्याचे देखील दिसून येत आहे. या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करत पुण्यात कोयता गँग आणि ड्रग्ज माफिया यांनी सुसंस्कृत पुण्याची वाट लावली असल्याचा आरोप केला आहे. तसेच पुण्याचे स्वयंघोषित नवे शिल्पकार असलेल्या गृहमंत्र्यांनी पुण्याचे मिर्झापुर करून सोडले असल्याचा आरोप देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता या अकार्यक्षम सरकारला बाजूला करून महाराष्ट्राला सुरक्षित करण्याची वेळ आली असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, ‘वारे वा सरकार आणि सरकारचे कार्यक्षम गृहमंत्री! पुण्याचे स्वंयघोषित नवे शिल्पकार असलेल्या गृहमंत्र्यांनी पुण्याचे #मिर्झापूर करूनच सोडले आहे. #कोयता गँग, ड्रग्स माफियानी सुसंस्कृत पुण्याची वाट लावली असून नागरिक अतिशय भितीत वावरत आहेत. राज्याच्या इतिहासात अशाप्रकारे कायदा- सुव्यवस्थेची लक्तरे कधी टांगली गेली नाहीत, असो अशा अकार्यक्षम सरकारला टाटा बायबाय करून महाराष्ट्राला सुरक्षित करण्याची वेळ आली आहे .’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… चला शिवस्मारक शोधायला:संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पहिले आंदोलन; भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न संभाजी राजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मान्यता मिळाली आहे. आता या पक्षाच्या वतीने राज्यातील पहिले आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई जवळ असलेल्या अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे जल पूजन झाले होते. हे शिव स्मारक शोधायला चला, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती हे भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत 10% अल्पसंख्याकांना उमेदवारी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कोट्यातून अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना 10 टक्के जागा देणार आहे. पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला लोकसभा निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला चारपैकी तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे युतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पूर्ण बातमी वाचा…. पुण्यात बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले:दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती; हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील बावधन परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हेलिकॉप्टर मध्ये तीन प्रवासी असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पडल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली असल्याचे दिसून आले. त्यामुळे या हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला. पूर्ण बातमी वाचा… लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाही त्यामुळे आता गाय आणली:गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान, ठाकरे गटाचा हल्ला गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. या संदर्भात दैनिक सामनामधून ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment