रांची: भारतीय संघ आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. या पहिल्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघ येथे पोहोचले आहेत. रांचीला पोहोचल्यावर पंड्याने प्रथम संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. हार्दिकने त्यांच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील वेगळाच अंदाज आणि या फोटोचे कॅप्शन चाहत्यांना फारच आवडले आहे. हार्दिकने धोनीसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, ‘शोलेचा दुसरा भाग लवकरच येत आहे.’

धोनी-हार्दिकचं खास कनेक्शन

जेव्हा जेव्हा भारतीय संघ रांचीला जातो तेव्हा संघातील खेळाडू धोनीची नक्कीच भेटत घेतात. तर हार्दिक पांड्यादेखील आता धोनीला भेटायला गेला होता. पांड्याने स्वतः अनेकदा सांगितले आहे की तो धोनीच्या क्रिकेटमुळे, त्याच्यामुळे प्रेरित झाला आहे. तर सोबतच संघाचे नेतृत्त्व कसे करावे आणि कशाप्रकारे मैदानावर शांत राहावे, हे सर्व तो धोनीकडून शिकला आहे. पांड्या अनेकदा धोनीसोबत पार्टीमध्ये दिसला आहे. मागे एकदा या दोघांचा पार्टीमधील डान्स करतानाच शानदार व्हिडीओही व्हायरल झाला होता.

वाचा: Republic Day: फक्त मैदानावरच नव्हे, या खेळाडूंनी लष्कराच्या गणवेशातही उंचावली देशाची मान

पांड्या हा टीम इंडियाचा भावी कर्णधार

भारतीय संघ बदलांच्या टप्प्यातून जात आहे आणि हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून तयार केले जात आहे, असे मानले जात आहे. यामुळेच त्याच्याकडे सलग दोन टी-२० मालिकेत भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर रोहित शर्माने वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व केले आहे. न्यूझीलंडपूर्वी हार्दिक श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही भारतीय संघाचा कर्णधार होता.

हेही वाचा: Women’s IPL: महिला आयपीएल संघांच्या मालकांची घोषणा, BCCI ने ५ संघ ४६७०

वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन रोहित शर्माला फक्त कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून कायम ठेवण्याच्या बाजूने आहे तर २०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून तयार केले जात आहे.

भारत न्यूझीलंड टी-२० मालिका वेळापत्रक

भारताने नुकतीच एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला. यानंतर आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारीला रांची येथे खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, दोन्ही संघांमधील दुसरा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जाईल, तर तिसरा आणि अंतिम टी-२० सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *