नवी दिल्ली : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील पराभवामुळं मोठा धक्का बसला. टीम इंडियानं स्पर्धेत सुरुवातीपासून विजयाची मालिका कायम ठेवली होती पण अखेरच्या सामन्यात पराभव झाल्यानं खेळाडूंना मोठा धक्का बसला. टीम इंडियाची यंग ब्रिगेड अंतिम फेरीच्या लढतीत अपेक्षेप्रमाणं कामगिरी करु शकली नाही. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करु शकले नाहीत. कालच्या पराभवातून सावरत शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानत पुढच्या काळात विजय मिळवणारच असं म्हटलं आहे.

शुभमन गिल काय म्हणाला?

टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल यानं कालच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत एक ट्विट केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहून त्यानं भावना व्यक्त केल्या आहेत. आता १६ तास होऊन गेलेले आहेत पण काल रात्री जे घडलं ते आता घडल्यासारखं वाटतं. काही वेळा तुम्ही सर्वकाही देता ते पुरेसे नसते. आम्ही आमचं ध्येय काबीज करण्यात अयशस्वी ठरलो, पण त्या दिशेनं टाकलेलं या प्रवासातील प्रत्येक पाऊल यांच्यातील टीम भावना आणि समर्पणाचा पुरावा आहे, असं शुभमन गिल यानं म्हटलं आहे.

आमच्या चाहत्यांनी आम्ही कामगिरीच्या यशामध्ये आणि अपयशामध्ये पाठिंबा दिला. आम्ही जोपर्यंत विजयी होत नाही तोपर्यंत हा आमच्यासाठी शेवट नसेल किंवा सर्व काही संपलेलं देखील नसेल, असं शुभमन गिल यानं म्हटलं आहे.
ICC ने जाहीर केली वर्ल्डकपची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, रोहित शर्मा कॅप्टन तर भारताच्या ६ खेळाडूंना मिळाले स्थान

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू सूर्यकुमार यादव यानं देखील कालच्या पराभवानंतर आज ट्विट केलं आहे. तो म्हणाला की स्वप्न भंग झालं आहे, हे दु: ख पचवायला वेळ लागेल. आम्ही विजयामध्ये आणि पराजयामध्ये देखील सोबत आहोत. टीम म्हणून आम्ही जे मिळवलं ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

रोहित शर्माने असं करायला नको होतं… सुनील गावस्कर हिटमॅनबद्दल असं का म्हणाले पाहा…
आम्ही मैदानात उतरल्यानंतर भारतीय प्रेक्षकांकडून प्रेम, पाठिंबा आणि ऊर्जा प्रत्येक वेळी मिलाली. सर्व भारतीय प्रेक्षकांचे आभार मानतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. त्यानं ऑस्ट्रेलियाचं विजयानिमित्त अभिनंदन देखील केलं आहे.
दुर्दैवानं काल आमचा दिवस नव्हता पण आम्ही पलटवार करु, नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर मोहम्मद शमीचं ट्विट, म्हणाला…
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *