सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले:धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; मंदिराच्या ट्रस्टने सर्व आरोप फेटाळले
तिरुपती बालाजीच्या प्रसादानंतर आता सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गंभीर आरोप होत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदरांने पिल्ले दिले असल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे. सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या पाकिटांवर ही उंदराची पिल्ले दिसत आहेत. करोडो हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी येथील प्रसादाच्या लाडूमध्ये वापर करण्यात आलेल्या तुपामध्ये चरबी असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडू मध्ये देखील उंदीर असल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे या प्ररकणाची चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणात समोर आलेला व्हिडिओ हा मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचे तरी षडयंत्र असल्याचे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट म्हटले आहे. या प्रकरणी कोणीतरी प्लास्टिक मध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडिओ काढला असावा, असा पलटवार स्ट्रस्टी सरवनकर यांनी केला आहे. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असल्याचा दावा देखील त्यांनी केला. प्रकार गंभीर, चौकशी होणार सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदीर जाण्याचा हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचा दावा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मंदिर प्रशासन देखील घडल्या प्रकाराची तपासणी करेल आणि योग्य ते स्पष्टीकरण देईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे पन्नास हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅम चे दोन लाडू भक्तांना प्रसाद म्हणून वाटप केले जातात. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण:विरोधकांकडून सरकारवर गंभीर आरोप; कुटुंबियांकडूनही संशय व्यक्त; शवविच्छेदनाला सुरुवात बदलापूर येथे 12-13 ऑगस्ट रोजी शाळेत दोन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. तपासासाठी नेत असताना आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून शिपायावर गोळीबार केल्याचे सरकारने म्हटले आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. आता या प्ररकणावर विरोधकांकडून अनेक आरोप होत आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यासह मुंबईत पावसाची हजेरी:सिंधुदुर्ग आणि रायगडमधील माणगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रेल्वेचा वेग मंदाावला हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत देखील जोरदार पावसासाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात रात्रीपासूनच मध्य रेल्वेचा वेग मंदावला आहे. पश्चिम रेल्वेवर देखील गोरेगाव ते कांदिवली दरम्यान काम चालू आहे. त्याचाही परिणाम पश्चिम रेल्वे वर झाला आहे. त्यामुळे आता या दोन्ही रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. राज्यात पुढील 24 तासात अनेक ठिकाणी रोजगार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…