पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या ( Nirmala Sitharaman Baramati Visit ) आजपासून म्हणजे २२, २३, २४ सप्टेंबरला बारामती मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात बारामती मतदारसंघातील विविध ठिकाणी सीतारामन या गाठीभेटी तसेच विविध कार्यक्रम घेणार आहेत. त्यांचा हा जो दौरा आहे तो केंद्र सरकारच्या विविध ज्या योजना आहेत. त्या योजनांचा बारामती लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो. या संदर्भात हा दौरा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा बारामती दौरा हा राजकीय दौरा नाही, असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

देशातील १४० लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, काय त्रुटी आहे, काय केलं पाहिजे? यासाठी केंद्रीय मंत्री त्या त्या मतदारसंघात जाऊन केंद्रीय योजनांचा आढावा घेणार आहेत, असं केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं आहे. यानुसार या दौऱ्यात बारामती मतदारसंघात जी विकास कामे रखडलेली आहे. जी विकास कामे होत नाहीये. अशासाठी निधी उपलब्ध करण्याचा आमचं प्रयत्न असणार आहे, असं यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Supriya Sule : भाजपने सरनाईक कुटुंबाची जाहीर माफी मागावी, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

भाजप यंदाच्या लोकसभेत बारामती काबीज करणार का? याबाबत हर्षवर्धन पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीला १८ महिन्यांचा कालावधी आहे. शेवटच्या ३ महिन्यांत इलेक्शन फिवर तयार होतो, इतक्या लवकर होत नाही. केंद्राने फक्त केंद्रीय मंत्र्यांना देशातील १४० लोकसभा मतदारसंघात केंद्रीय योजनांच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी पाठवलं आहे. आणि ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. केंद्रीय अर्थमंत्री ३ दिवस बारामतीतील गाववस्तीत आढावा घेणार आहेत, असं देखील यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘त्यांनी ५० खोके घेतले, त्यामुळे काम करायची गरज वाटत नाही’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.