नवी दिल्ली : बहुतेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर गॅझेट खरेदी करण्यासाठी केला त्यातील बर्‍याच लोकांना Amazon-Flipkart आणि Myntra सारखे फक्त ई-कॉमर्स साईट्स माहित आहेत परंतु असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत जे खूप कमी किमतीत गॅझेट प्रदान करतात. पण हे गॅझेट सेकंड हँड असतात, सेकंड हँड असूनही यांची कंडीशन चांगली असल्याने ही एक चांगली डिल असू शकते. ज्यामुळे या साइट्सवर तुम्ही फक्त २० हजार रुपयांमध्ये आयफोन खरेदी करू शकता. चलातर अशा काही वेबसाइट्सबद्दल जाणून घेऊ…

Cashify
कॅशिफायवर स्मार्टफोन, टॅब्लेट, टीव्ही, कॅमेरा, iMacs, गेमिंग कन्सोल आणि AC सारख्या गॅझेट्सचे भरपूर प्रोडक्ट आहेत. या वेबसाइटवर अतिशय कमी किमतीत गॅजेट्स खरेदी करता येतात. इतर साइट्सच्या तुलनेत येथे स्मार्टफोन खूपच कमी किमतीत खरेदी करता येतात.

2gud
Cashify प्रमाणेच, 2gud स्मार्टफोन, टॅब्लेट, गेमिंग कन्सोल आणि टीव्ही यांसारख्या गॅझेट्सच्या विक्रीसाठी ओळखली जाते.इथूनही तुम्ही खरेदी आणि विक्री करू शकता. फ्लिपकार्टच्या मालकीच्या या साइटवर, जर तुम्हाला सेकंड हँड गॅझेट खरेदी केल्यानंतर ते आवडत नसतील तर परतावा देखील केला जाऊ शकतो.

कर्मा रिसायक्लिंग
ही वेबसाइट सेकंड हँड उपकरणांसाठी देखील एक चांगला पर्याय आहे. येथे प्रोडक्ट खरेदी करण्यासोबतच ग्राहक त्यांचे जुने आणि सदोष गॅजेट्स जसे की स्मार्टफोन, टॅबलेट सहज विकू शकतात.

ControlZ
या वेबसाइटवर अगदी २० हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सेकंड हँड iPhones खरेदी करता येतील. आयफोनसोबतच इतर कंपन्यांचे स्मार्टफोनही अत्यंत कमी किमतीत खरेदी करता येतात.

वाचा : इंटरनेट वापरताना ‘या’ ७ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *