नवी दिल्ली: Redmi Note 11 Pro+ Price: Xiaomi चे स्मार्टफोन आवडत असतील तर, Redmi Note 11 Pro+ स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय हँडसेट Redmi Note 11 Pro+ ची किंमत कमी केली आहे. फोनच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत १००० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याच वेळी या फोनचा 8 जीबी रॅम व्हेरिएंट २००० रुपयांनी स्वस्त झाला आहे. किंमतीत कपात केल्यानंतर फोनच्या 6 GB रॅम व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपयांवर गेली आहे. त्याच वेळी, फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत आता २०,९९९ रुपये झाली आहे.

वाचा: फोनमधून ताबडतोब डिलीट करा हे ४ Dangerous Apps, अन्यथा बँक अकाउंट रिकामे झालेच समजा

Redmi Note 11 Pro+ चे 8 GB RAM + 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट विकत घ्यायचे असेल तर, आता तुम्हाला २४,९९९ रुपयांऐवजी फक्त २२,९९९ रुपये खर्च करावे लागतील. किंमतीतील कपात व्यतिरिक्त, कंपनी या फोनवर अनेक आकर्षक डील ऑफर करत आहे. फोन खरेदी करण्यासाठी HDFC बँकेचे कार्ड वापरल्यास १५०० रुपयांची झटपट सूट देखील मिळेल. तसेच, फोनवर १६,५०० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही देण्यात आहे.

वाचा: Black Friday सेलमध्ये धमाकेदार डील, अर्ध्यापेक्षा कमी किमतीत घरी येईल Samsung चा महागडा स्मार्टफोन

Redmi Note 11 Pro+ 5G फीचर्स :

फोनमध्ये, कंपनी १०८० x २४०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६७ -इंच फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले १२० Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील देत आहे. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी तीन कॅमेरे:

फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स आणि १०८ -मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह २-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये १६ -मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये दिलेली बॅटरी ५००० mAh आहे, जी ६७ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा: थंडीमुळे घराचं महाबळेश्वर झालय ? खरेदी करा हे Room Heaters, मिनिटांत घर होईल गरम, किंमत ५९९ रुपयांपासूनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *