वाचा: Best AC : ‘या’ बेस्टसेलर AC चा धुमाकूळ, डिव्हाइसमध्ये आहे ६ इन १ कूलिंग फीचर, खरेदीवर ४१ % ऑफ
तुम्ही Vivo Y33T दरमहा किमान ८४७ रुपयांमध्ये घरी देखील आणू शकता. या फोनसोबत बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला १० टक्के त्वरित सूट देखील दिली जाईल. याशिवाय, तुम्हाला Vivo Y33T सह एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल. जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला १०,०५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. जर तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला हा फोन फक्त ७९४० रुपयांना मिळू शकेल.
Vivo Y33T मध्ये काय आहे खास ?
फोनमध्ये २४०८ x १०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५८ -इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. तसेच, हा फोन Android 11 वर काम करतो. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला असून त्याचा पहिला सेन्सर ५० मेगापिक्सेलचा आहे. दुसरा २ मेगापिक्सेल आणि तिसरा २ मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.