नवी दिल्ली: Realme Narzo 50 Price: तुम्ही Realme Narzo 50i खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण, या फोनच्या खरेदीवर ६ % डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत ७,४९९ रुपये असेल. तसेच, फोन खरेदीवर तुम्हाला अनेक बँक ऑफर अंतर्गत सूट मिळेल. Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला १० % सूट मिळू शकते. तसेच, तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर ५ % ची सूट मिळू शकते. मात्र यासाठीही आधी किमान ५ हजार रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. तुम्ही हा फोन खरेदी केल्यास आणि या कार्डनी पैसे भरल्यास सवलत ऑफर लागू होईल. तसेच, Axis Bank क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यावर तुम्हाला ५० रुपयांची त्वरित सूट मिळते.

वाचा: तुम्हीही खरेदी करा आयफोन ! iPhone 13, iPhone 12 सह ‘या’ मॉडेल्सवर तब्बल १५ हजारांपर्यंतची सेव्हिंग करण्याची संधी

एक्सचेंज ऑफरमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येतील:

एक्सचेंज ऑफरमध्येही फोन खरेदी करता येईल. जर जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर, तुम्हाला ६, ७५० रुपयांची सूट मिळू शकते. कंपनीकडून फोनवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. फोनसोबत येणाऱ्या अॅक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी आहे. हा फोन २ GB + ३२ GB व्हेरिएंटमध्ये येतो. त्याचा डिस्प्ले ६.५ इंच आहे. कंपनीने बॅटरीबाबतही चांगले काम केले आहे. यामुळेच या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

वाचा: हार्ट रेट- स्ट्रेस मॉनिटरिंगसह Amazfit Zepp E वॉच लाँच, डिव्हाइस नॉन स्टॉप ७ दिवस चालणार, पाहा किंमत

कंपनीने नार्झोचा कॅमेरा देखील सुधारला आहे:

Realme Narzo मध्ये ५ MP फ्रंट कॅमेरा आणि ८ MP रियर कॅमेरा आहे. रिअर कॅमेरासोबत फ्लॅशचा पर्यायही दिला आहे. याव्यतिरिक्त, यात एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील आहे. हा फोन 4G VoLTE नेटवर्कवर काम करतो. त्यात गुगल क्रोम ब्राउझर इन्स्टॉल करण्यात आले आहे.

वाचा: स्वस्तात मस्त वर्षभराचा रिचार्ज करून Father’s Day निमित्त वडिलांना द्या हटके गिफ्टSource link

Leave a Reply

Your email address will not be published.