वाचा: Smart TV Offers : अवघ्या १६ हजारात मिळतोय ४० इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही, इतर मॉडेल्सवर देखील मोठा ऑफ
Xiaomi 11 Lite NE 5G चे फीचर्स:
फोनमध्ये कंपनी ६.५५ -इंचाचा फुल एचडी + OLED डॉट डिस्प्ले ऑफर करत असून हा डिस्प्ले डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि ९० Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. हा Xiaomi स्मार्टफोन ८ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Snapdragon 778G चिपसेट देत आहे.
वाचा: Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन सण येतोय, बहिणीसाठी आधीच ऑर्डर करा ‘हा’ स्मार्टफोन
ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप:
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ६४ -मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि ५-मेगापिक्सेल सुपर मॅक्रो लेन्ससह ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
फोनमध्ये लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी :
हेवी गेमिंग दरम्यान फोन गरम होऊ नये यासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, यात ४२५० mAh बॅटरी आहे. जी, ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज या फोनला कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6 आणि USB Type-C पोर्ट व्यतिरिक्त सर्व मानक पर्याय मिळतील.
वाचा: Best Deals: येतोय ‘हा’ खास सेल, स्मार्टफोन, टीव्ही फ्रिज, AC सह बरंच काही स्वस्तात खरेदी करता येणार