नवी दिल्ली: iPhone 13 Discounts : iPhone 14 लाँच झाल्यानंतर जुन्या iPhone 13 स्मार्टफोनच्या किमतीत सातत्याने कपात होत आहे आहे. अशात iPhone 13 खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. iPhone 14 लाँच झाल्यानंतर Apple iPhone 14 ची रिटेल किंमत ६९,९०० रुपयांवर गेली आहे. आयफोन 13 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यावेळी फोनची किंमत ७९,९०० रुपये होती. पण, iPhone 14 लाँच झाल्यानंतर iPhone 14 च्या किमतीत १०,००० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. पण, आता ई-कॉमर्स कंपनी Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सीझन सेल दरम्यान iPhone 13 च्या किमतीत पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे.

वाचा: Latest Smartphones: मागील आठवड्यात ‘या’ दमदार स्मार्टफोन्सने केली मार्केटमध्ये एन्ट्री, पाहा तुमच्यासाठी कोणता बेस्ट

iPhone 13 किंमत :

iPhone 13 स्मार्टफोनच्या 256 GB मॉडेलची किंमत ७४,९०० रुपये आहे. तर, 512 GB व्हेरिएंटची किंमत ९९,९०० रुपये आहे. याशिवाय, ई-रिटेलद्वारे १४,८५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. अशात तुम्ही ४१,८५० रुपयांमध्ये iPhone 13 खरेदी करू शकाल.

वाचा: हटके डिझाईनसह येणारा Nothing Phone 1 खरेदी करायचा असेल तर, ही ऑफर मिस करू नका

iPhone 13 चे फीचर्स:

Apple iPhone 13 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हा फोन सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शनसह येतो. यामध्ये Apple A15 Bionic चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. यात १९ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. १२ MP True Depth फ्रंट कॅमेरासह फोनमध्ये नाईट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग देण्यात आले आहे.

Apple iPhone 12:

Apple iPhone 12 ची भारतात सध्याची किंमत ५९,९९० रुपये आहे. सेलमध्ये iPhone 12 तब्बल ४०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. ही बेस व्हेरिएंटची किंमत आहे. ऍमेझॉनचा दावा आहे की, आयफोन 12 ची ही सर्वात कमी किंमत आहे. iPhone 12 स्मार्टफोनमध्ये ६.१ -इंचाचा OLED डिस्प्ले आहे. हा फोन सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले सपोर्टसह येतो. फोनमध्ये सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोन A14 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो.

वाचा: MMS Case: तुमच्या प्रायव्हेट मुमेंट्सवर हिडन कॅमेराची नजर तर नाही ? असे करा माहित, घ्या विशेष काळजीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.